शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना खडसेंच्या निवडणूकपूर्व शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 11:23 IST

नवीन मंदिरावर वाढदिवसाच्या औचित्याने घेतली सदिच्छा भेट

मुक्ताईनगर : आमदार एकनाथराव खडसे यांची पक्षांतर्गत होणारी मुस्कटदाबी. रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपा उमेदवाराबाबत अनिश्चितता आणि उद्विग्न खडसे यांनी मुख्यमंत्रीपद व अंबानी बंगल्याचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर विषय काढल्या नंतर मंगळवारी दुपारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची संत मुक्ताबाई नवीन मंदिरावर वाढदिवसाच्या औचित्याने सदिच्छा भेट घेतली.भेट जरी सदिच्छा असली तरी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य भूमिकेबाबत या भेटीला राजकीय कंगोरे आहेत.एरवी श्री क्षेत्र कोथळी मुक्ताई मंदिरावर आता अध्यात्मिक कार्यक्रमात आमदार एकनाथराव खडसे व अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची भेट होत असते.परंतु मंगळवारी स्वत: खडसे यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई नवीन मंदिरावर जावून रवींद्र पाटील यांची भेट घेतली हे विशेष. या वेळी बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस बी. सी. महाजन, सतीश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यु.डी. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख ईश्वर रहाणे, माजी सभापती आनंदराव देशमुख उपस्थित होते.४एरवी पक्ष निरीक्षकाची भूमिका बजावणारे डॉ. राजेंद्र फडके यांनी अ‍ॅड.रवींद्र पाटील यांना शहरातील मुख्य चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नंतर परत ते रवींद्र पाटील व खडसे यांच्या भेटी पूर्वी नवे मुक्ताई मंदिर येथे पोहोचले होते ही बाब लक्षवेधी ठरली.

टॅग्स :Politicsराजकारण