शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

एटीएममध्ये ठणठणाट

By admin | Updated: March 13, 2017 00:54 IST

सलग सुटय़ांचा फटका : बँकांची उदासीनता, ग्राहकांचे प्रचंड हाल

भुसावळ : सलग आलेल्या तीन दिवसीय सुटय़ांमुळे शहरातील जवळपास सर्वच एटीएम केंद्रातील रोकड संपल्याने ग्राहकांना मोठे हाल सोसावे लागत आह़े राष्ट्रीयकृत व खासगी बँकांकडून रोकड टाकण्याबाबत एकूणच असलेल्या उदासीनतेमुळे ग्राहकांचे व्यवहार खोळंबले, तर शहरातील अपवादात्मक बँकांनी मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ दिली नाही़शहरातील सुमारे 10 वर बँकेच्या एटीएममध्ये शनिवारपासून रोकड संपल्याने ग्राहकांना फिरफिर करावी लागत आह़े शनिवारी व रविवारी आलेली सुटी, तर सोमवारी होळी-रंगपंचमीनिमित्तदेखील सुटी असल्याने सलग सुटय़ांचा ग्राहकांना मोठा फटका बसला आह़े जवळपास सर्व बँकांमधील एटीएममध्ये रोकड नसल्याने ग्राहकांच्या संतापात अधिक भर पडली़दहा बँकांच्या एटीएममध्ये रोकड नाहीशहरातील जामनेर रोडवरील जवळपास सर्वच एटीएम केंद्रांवरील रोकड संपल्याने ग्राहकांना अन्य भागात धाव घ्यावी लागली़ या एटीएममध्ये ठणठणाटपांडुरंग टॉकीज चौकातील बँक ऑफ इंडियाचे, अॅक्सिस बँकेचे, तसेच जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेट्रोल पंपावरील एटीएममधील रोकड संपली आहे, तर उत्तर भागातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील एसबीआय, आयडीबीआय, वसंत टॉकीज परिसरातील बडोदा बँक, विठ्ठल मंदिर वॉर्डातील महाराष्ट्र बँक, न्यू एरिया वॉर्डातील आयडीबीआय बँक, जामनेर रोडवरील इको बँक, पंजाब नॅशनल बँकांच्या एटीएममध्ये रोकड नसल्याने ग्राहकांना मोठाच मनस्ताप सोसावा लागला़ नोटाबंदीनंतरही दिलासा नाहीशनिवारी व रविवारी आलेल्या सलग सुटय़ा, तर सोमवारी धूलिवंदननिमित्त सुटी आल्याने ग्राहकांनी एटीएमचा अधिक वापर केला़ मुळात नोटाबंदीपासून  अनेक बँकांनी एटीएम सुरू करण्याबाबत उदासीनता दर्शवल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत़  ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन टक्के जादा भरुदडपंतप्रधानांनी ऑनलाइन व्यवहारावर जादा भर दिला असला तरी शहरात मात्र ग्राहक ऑनलाइन व्यवहार करण्याबाबत एकूणच नाखुश आहेत़ साध्या औषधी दुकानावर पाचशे रुपयांची औषधी घ्यावयाची म्हटल्यास त्यामागे दोन टक्के अधिकचा जादा चार्ज द्यावा लागतो. हीच गत मोबाइल दुकानांसह अन्य व्यवहारांना लागू पडत आह़े दुकानदारांच्या मते खासगी बँका त्यांच्याकडून या ट्रान्झक्शनसाठी त्यांना रक्कम आकारतात. त्यामुळे त्यांना नाइलाजाने ग्राहकांकडून दोन टक्के चार्ज घ्यावा लागतो़ दोनच एटीएम सुरू4 शहरातील जामनेर रोडवरील एचडीएफसीसह स्टेट बँक मुख्य शाखेचे एटीएम सुरू असल्याने ग्राहकांना दिलासा आहे. मात्र हे एटीएम रात्री बंद राहत असल्याने गैरसोय होत आह़े