शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
3
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
5
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
6
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
7
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
8
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
9
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
10
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
11
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
12
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
13
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
14
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
15
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
16
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
17
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
18
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
19
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
20
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

श्रीमंताच्या बेसमेंटवर हात, हॉकर्सच्या पोटावर लाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

वार्तापत्र, अजय पाटील महापालिकेचे डॅशिंग उपायुक्त समजले जाणारे संतोष वाहुळे यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाचा पदभार आल्यानंतर वाहुळे यांनी रस्त्यावर ...

वार्तापत्र, अजय पाटील

महापालिकेचे डॅशिंग उपायुक्त समजले जाणारे संतोष वाहुळे यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाचा पदभार आल्यानंतर वाहुळे यांनी रस्त्यावर बसणाऱ्या हॉकर्सवर जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. संतोष वाहुळे यांच्या नावाचा दरारा इतका आहे की, वाहुळे यांचे पथक आल्याची अफवाही पसरवली तरी रस्ता अतिक्रमणमुक्त होत असतो. रस्त्यावरील अतिक्रमण वाढले तर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असते, त्यामुळे अनधिकृत हॉकर्सला शिस्त लावलीच पाहिजे. रस्त्यावर व्यवसाय करणारे हॉकर्स हे आपला व्यवसाय श्रीमंत होण्यासाठी नाही तर आपली दररोजची उपजीविका भागविण्यासाठी करतात; मात्र मनपाच्या रडारवर नियम भंग करणारे हॉकर्सच नेहमी असतात. कारण कारवाईसाठी हॉकर्स हे ‘हलकी वडांग’ ठरत आहेत. तर दुसरीकडे बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांमुळेदेखील पार्किंगची समस्या निर्माण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो; मात्र या समस्येकडे मनपाचे कधीही लक्ष गेले नाही. केवळ नोटीसा देऊन इशारा देण्याचेच काम मनपा प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे अतिक्रमणाच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठविणारे राजकीय पक्ष बेसमेंटच्या प्रश्नावर गप्प आहेत. मनपाच्या कारवाईत एकांगीपणा दिसून येत आहे. नियम सर्वांसाठी असतात, असे म्हणतात; मात्र जळगाव मनपाच्या हद्दीत नियम हे केवळ हॉकर्ससाठीच असतात, असेच दिसून येते. इतरांनी कितीही नियमांचा भंग केला तरी त्यांना अभय मिळतेच, हे त्यांना माहिती आहे; तसेच त्यांच्यावर कारवाईही झाली तरी त्यांच्यासाठी एका फोनवर नगरसेवक व कुठल्यातरी पक्षाचा पदाधिकारी धावून येतो, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मनपा प्रशासन केवळ आपली कारवाईची धमक ही गरीब अन‌् रस्त्यावरील व्यवसायावर पोट भरणाऱ्यांवरच दाखवू शकते. श्रीमंतांना नियम भंग करण्याचे लायसन्सच मनपाने एकप्रकारे दिले आहे.