शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

हगणदरीमुक्तीत मनपा पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 00:59 IST

नगरविकास विभागाची नाराजी : मुंबईत घेतला जाणार आढावा

जळगाव : हगणदरीमुक्तीत मनपाकडून अद्याप समाधानकारक कामगिरी नसल्याने मनपाच्या कामकाजावर नगर विकास विभागाने नाराजी व्यक्त केली असून कामांना गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भात १ मार्च रोजी मुंबईत आढावा बैठकही घेतली जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ भारत अभियान तसेच हगणदरी मुक्तीसाठी विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. मात्र त्यात अद्यापही फारशी प्रगती नाही. या संदर्भातील अहवाल पाहिल्यानंतर नगर विकास विभागानेही नाराजी व्यक्त केली आहे. या विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांचे पत्र मनपास प्राप्त झाले आहे. हगणदरी मुक्तीची प्रगती असमाधानकारक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हे उद्दीष्ट ३१ मार्च २०१७ पूर्वी पूर्ण करून शहर हगणदरी मुक्त करावे असे आदेशही या पत्रात देण्यात आले असून १ मार्च रोजी मुंबईत आढावा बैठक घेतली जाणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. या बैठकीत हगणदरीमुक्तीचा अहवाल सादर करावा लागणार  आहे. वैयक्तिक शौचालयांवर भरहगणदरी मुक्तीचा एक भाग म्हणून शहरात गरीब वस्त्यांमध्ये वैयक्तीक शौचालय उभारणी केली जात आहे. यासाठी मनपाकडे ५६३६ अर्ज प्राप्त झाले होते. शौचालय बांधण्यासाठी लाभधारकास १२ हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. शासनाकडून त्यासाठी ५ कोटी ६२ लाखाचे अनुदानही प्राप्त झाले आहे. यात काहींना अनुदानाचा पहिला तर अनेकांना दुसरा हप्ताही वितरीत झाला आहे. १७८७ नागरिकांनी अनुदान घेऊन अद्यापही शौचालयाचे बांधकाम केलेले नाही. तर ११३० जणांचे बांधकाम सुरू झाले आहे. अनुदानातून शहरात आतापर्यंत २७१९ जणांची शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. अर्ज आलेल्या ५६३६ नागरिकांना मनपाने शौचालय उभारणीसाठीचा पहिला सहा हजाराचा हप्ता म्हणजे ३ कोटी ३८ लाख १६ हजाराचे अनुदान वितरीत केले आहे.