शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हमास-इस्रायलच्या तणावाने अचानक सोने-चांदी वधारली!

By विजय.सैतवाल | Updated: October 7, 2023 21:11 IST

चांदी एकाच दिवसात १६०० रुपये, सोने ३०० रुपयांनी महागले

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गेली काही दिवसांपासून घसरत गेलेले सोने-चांदीचे भाव आता हमास व इस्रायल यांच्यातील तणावानंतर पुन्हा वाढू लागले आहे. त्यामुळे शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तसेच, सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वधारले. त्यामुळे चांदी पुन्हा ६९ हजार रुपयांच्या पुढे जाऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोनेदेखील ५७ हजार ९०० रुपये प्रति तोळा झाले.

गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्ष सुरू झाला व सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले. आठवडाभरात सोने एक हजार ४०० रुपयांनी, तर चांदी चार हजार १०० रुपयांनी घसरली. सात महिन्यांतील नीचांकी भाव होते. त्यानंतर मात्र इस्रायल व हमास यांच्यातील तणावाचे रूपांतर हल्ल्यात होऊन हमासने पाच हजारपेक्षा जास्त रॉकेट इस्रायलवर डागले. त्यात अमेरिकेने या हल्ल्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात सोने-चांदीवर तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा लगेच परिणाम होतो.

त्यानुसार शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीचे भाव थेट एक हजार ६०० रुपयांनी वाढले. त्यामुळे शुक्रवार, ६ ऑक्टोबरपर्यंत ६७ हजार ९०० रुपयांवर आलेली चांदी शनिवारी ६९ हजार ५०० रुपये प्रति किलो झाली. तसेच, ५ ऑक्टोबर रोजी ५७ हजार ४०० रुपयांवर आलेल्या सोन्याच्या भावात ६ ऑक्टोबर रोजी २०० रुपयांची, तर ७ ऑक्टोबर रोजी ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ५७ हजार ९०० रुपये प्रति तोळा होऊन ते पुन्हा ५८ हजारांच्या जवळ पोहोचले. हे युद्ध आणखी तीव्र झाल्यास सोने-चांदीसह अन्य घटकांवरदेखील त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तणावाचा परिणाम

गेली काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव कमी झाल्यानंतर खरेदी वाढली. मागणी वाढल्याने आता पुन्हा भाव वाढत तर आहेच शिवाय हमास व इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होऊन शनिवारी त्यांचे भाव वाढले. - मनीष जैन, सुवर्ण व्यावसायिक.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी