शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

जळगावात भारनियमनामुळे दालफडमधील उत्पादन निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 22:28 IST

जोरदार फटका: कामगारांवर बेरोजगाराची वेळ

ठळक मुद्दे40 लाकडी वखारींवरही संकटउलाढाल ठप्पउत्पादन खर्च वाढल्याने आर्थिक भूर्दंड 

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19 - गेल्या 40 वर्षापासून डाळ तयार करण्यासह कडधान्याला पॉलिश करणा:या जळगावातील दालफड उद्योगाला भारनियमनाचा फटका बसत असून येथील उत्पादन निम्म्यावर आले आहे. इतकेच नव्हे 200हून अधिक कामगारांवर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. या सोबतच 40 लाकडाच्या वखारींनादेखील याची झळ पोहचत आहे. शहरातील शिवाजीनगरमध्ये नवीन हुडको भाग, भुरे मामलेदार प्लॉट या भागांमध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून दालफड सुरू आहे. दालफड व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांमार्फत चालविण्या:या या उद्योगामध्ये डाळ तयार करण्यासह मठ, उडीद, मूग यांना पॉलिश करण्याचे काम केले जाते. मात्र गेल्या दोन अडीच महिन्यांपासून या उद्योगाला वेगळ्य़ावेगळ्य़ा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  

9 तास भारनियमनामुळे फटका1 जुलै पासून लागू झालेल्या वस्तू व सेवा करामुळे  (जीएसटी) दालफड व्यापारी हैराण झाले. त्यानंतर यातून कसेबसे सावरत नाही तोच आता गेल्या 10 दिवसांपासून  या उद्योगाला भारनियमनाचा फटका बसत आहे. शिवाजीनगर येथे दररोज सकाळी साडेचार तास व दुपारी अथवा संध्याकाळी साडेचार तास भारनियमन केले जात आहे. दिवसभरातील नऊ तासाच्या भारनियमनामुळे हा उद्योग कोलमडला असून व्यापारी चिंतातूर झाले आहेत.  पॉलिश होईनादालफडमध्ये दररोज 50टन डाळीचे उत्पादन केले जाते. मात्र सध्या मालाची आवक नसल्याने तसेच पावसाळी वातावरणामुळे डाळ वाळत नाही म्हणून येथे डाळीचे उत्पादन नसते. पॉलिशचे काम या दिवसात केले जाते. त्यानुसार दररोज 100 टन मालाला पॉलिश केली जाते. मात्र भारनियमनामुळे हे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी झाले आहे. सध्या 50 टनमालदेखील तयार होत नसल्याचे येथील व्यापा:यांनी सांगितले. 

दालमिलमध्ये जवळपास 200 कामगार आहे. मात्र भारनियमनामुळे उत्पादन बंद असले तरी उद्योजकांना मजुरी मोजावीच लागत आहे आणि मालाचे उत्पादन मात्र कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे  वस्तूंवरील उत्पादन खर्च वाढला आहे तर दुसरीकडे पाहिजे तसा भाव मालाला मिळत नाही. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. 

दालफडमधून शहरातील व्यापारी केंद्र असलेल्या दाणाबाजारात दररोज डाळी व इतर धान्याची दररोज मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. मात्र भारनियमनामुळे शार्टेक्स मशिनदेखील चालविता येत नसल्याने उलाढाल जवळपास ठप्प झाली आहे.     दालफडसोबतच या भागातील लाकूडपेठ, शिवाजीनगर येथे 40 लाकडी वखारी आहेत. त्यांनाही या भारनियमनाचा फटका बसून तेथील उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

बेरोजगारी वाढण्याची भीतीवर्षभर चालणा:या दालफड व लाकडी वखारी येथे सध्या भारनियमनामुळे काम होत नसल्याने कामगार हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे दालफडमधील 200 तर वखारींमधील 175 कामगारांनादेखील झळ बसू शकते. त्यामुळे 375 कामगारांवर बेरोजगारीचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात केवळ शनिवारी भारनियमन केले जाते. त्याच धर्तीवर शिवाजीनगर भागात वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी दालफड व्यापारी असोसिएशनच्यावतीने वीज वितरण कंपनीकडे केली आहे. 

आधीच जीएसटीमुळे उद्योजक हैराण असून आता भारनियमनामुळे मोठा फटका बसत आहे. उत्पादन निम्म्यावर आले असून येथे आठवडय़ातून एकच दिवस भारनियमन करण्यात यावे अथवा त्याचे प्रमाण कमी करण्यात यावे. - गोपाल व्यास, अध्यक्ष, दालफड व्यापारी असोसिएशन, जळगाव.