शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निम्मा जळगाव जिल्हा दुष्काळी, 8 तालुक्यातील 814 गावे 50 पैशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:58 IST

7 तालुके पूर्ण दुष्काळी

ठळक मुद्देपारोळ्याचा अपवाद7 तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी 50च्या वर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16- जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून 15 तालुक्यातील एकूण 1502 गावांपैकी 8 तालुक्यातील 814 गावांची पैसेवारी 50पैशांच्या आत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात 7 तालुक्यांची पूर्णपणे पैसेवारी 50 टक्कय़ांच्या आत असून केवळ पारोळा तालुक्यातील काही गावे 50 पैशांच्या आत आहेत. तर 688 गावांची पैसेवारी 50च्या वर आहे. त्यामुळे 50पैशांच्या आत पैसेवारी असलेला निम्म्याहून अधिक जिल्हा दुष्काळी जाहीर होणार असून त्यानुसार उपाययोजना केल्या जातील. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. काही तालुक्यात बरा पाऊस झाला तरी परिस्थिती बिकट असल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत होती. मात्र नियमानुसार पैसेवारीच्या  आकडेवारीवरूनच दुष्काळ जाहीर करता येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे अंतीम पैसेवारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यानुसार शुक्रवारी अंतीम पैसेवारी जाहीर झाली. त्यात जिल्ह्यातील 1502 गावांपैकी 814 गावांची पैसेवारी 50च्या आत असून 688 गावांची पैसेवारी 50च्या वर  आहे. 7 तालुके पूर्ण दुष्काळी15 पैकी 7 तालुक्यांमधील सर्व गावांची पैसेवारी 50च्या आत असल्याने हे संपूर्ण तालुकेच दुष्काळी ठरले आहेत. त्यात जामनेर (152 गावे), बोदवड (51), मुक्ताईनगर (81), पाचोरा (129), भडगाव (63),अमळनेर (154), चाळीसगाव (136 गावे) या तालुक्यांचा समावेश आहे.7 तालुक्यांची पैसेवारी 50च्या वर7 तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी 50च्या वर आहे. त्यात  जळगाव (92 गावे), एरंडोल (65 गावे), धरणगाव (89 गावे), भुसावळ (54 गावे), यावल (84 गावे), रावेर (121 गावे), चोपडा (117 गावे) या तालुक्यांचा समावेश आहे. पारोळ्याचा अपवादपारोळा तालुक्यातील 114 पैकी 48 गावांची पैसेवारी 50च्या आत असून 66 गावांची पैसेवारी 50च्या वर आहे.