शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चहार्डी-अकुलखेडा रस्त्यालगत निंबाच्या झाडांची दिवसाढवळ्या कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 15:10 IST

चहार्डी-अकुलखेडा या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेली निंबाची मोठी पाच झाडे बुंध्यापासून कापून नेण्यात आली आहेत.

ठळक मुद्देवन व बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका पाच झाडांची झाली कत्तल

संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : चहार्डी-अकुलखेडा या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेली निंबाची मोठी पाच झाडे बुंध्यापासून कापून नेण्यात आली आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि चोपडा वनविभागाने बघ्याची भूमिका घेतली. मात्र याबाबत ‘लोकमत’ने विचारणा केली त्यावेळी धावपळ सुरू झाली. घटनास्थळी अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.चहार्डीपासून अकुलखेड्याकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यालगत तीन किलोमीटर अंतरावर पाच भल्या मोठ्या लिंबाच्या या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल सुरु होती.वृक्ष तोडण्यासाठी परवानगी घेतलेली आहे का? अशी विचारणा लोकमत प्रतिनिधीने केली असता सदर वेळी मात्र वृक्षांची कत्तल करणाऱ्यांची तारांबळ उडाली आणि संबंधित अधिकाºयांना याबाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीला एकमेकांकडे बोटे दाखवली. नंतर मात्र घटना स्थळी वृक्षांची कत्तल झालेल्या ठिकाणी आर.एफ.ओ. यांनीही त्यांचे कर्मचारी पाठवले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाºयांनी भेट दिली. नंतर वन विभागाच्या अधिकाºयांनी कत्तल करणाºयांचे मशीन जप्त केले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी गणेश पाटील यांनीही या बाबतीत आमच्याकडून कोणतीही परवानगी नसल्याचे कळविले आहे. मात्र हे सर्व सोपस्कार आधी केले असते तर कदाचित हे पाच वृक्ष वाचू शकले असते.पंचनामा, मशीन जप्तवनविभागाचे परेड गार्ड कर्मचारी देवरे यांनी कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा केला आहे व कत्तलीसाठी वापरण्यात येणारे मशीन जप्त केले आहे.-दत्तात्रय लोंढे, आरएफओ, चोपडा.परवानगी नाहीपाच झाडांची कत्तल झाली आहे. वृक्ष तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.-गणेश पाटील, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, चोपडा

टॅग्स :Natureनिसर्गChopdaचोपडा