आॅनलाईन लोकमतसाकळी, ता.यावल,दि.२१ : हजयात्रेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ झाल्याचा लाभ भाविकांनी घेतला. १९ डिसेंबर पर्यंत भारतातून तीन लाख १७ हजार भाविकांचे अर्ज हज कमेटीला प्राप्त झाल्याची माहिती हजकमेटी सूत्रांनी दिली. २२ डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. दोन दिवसात अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.हज कमेटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकसूद अहमद खान यांनी सांगितले, आता मुदतवाढ होणार नाही. आतापर्यंत दाखल अर्जाची संख्या कोट्यापेक्षाही दुप्पट आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी अर्जाची संख्या कमी मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.गेल्या वर्षी भारतातून चार लाखावर भाविकांचे अर्ज प्राप्त झाले होते. आता दोन दिवसात किती अर्ज दाखल होतील हे २२ डिसेंबरनंतर समजेल. कमी अर्ज प्राप्त होण्याचे मुख्य कारण चार वर्षापर्यंत अर्ज दाखल करणाºया भाविकांची आरक्षण रद्द करणे होय.७ जानेवारी २०१८ ला भारत व साऊदी अरबमध्ये हजयात्रेविषयी करार केला जाणार आहे. त्यानंतर ८ व ९ जानेवारी २०१८ रोजी लोकसंख्येनुसार कोट्याची विभागणी केली जाणार आहे. १० ते १५ जानेवारी दरम्यान राज्यस्तरावरील अर्जामधून सोडत काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.हज कमेटीच्या इतिहासात प्रथमच हजयात्रा २०१७ पूर्ण होताच हजयात्रा २०१८ साठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावर्षी मोठ्या संख्येने भाविकांनी आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.
हजयात्रेसाठी देशभरातून तीन लाख अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 17:11 IST
७ जानेवारी २०१८ ला भारत व साऊदी अरबमध्ये हजयात्रेविषयी करार होणार
हजयात्रेसाठी देशभरातून तीन लाख अर्ज दाखल
ठळक मुद्दे नोंदणीसाठी उद्या शेवटची मुदत७ जानेवारी २०१८ ला भारत व साऊदी अरबमध्ये हजयात्रेविषयी करार होणार१० ते १५ जानेवारी दरम्यान प्राप्त अर्जांमधून सोडत काढणारभाविकांनी केली आॅनलाईन अर्जांची नोंदणी