शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड जि.प.शाळांमधील शिक्षकांचे वर्गणी करुन ‘ज्ञानदीप अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 12:44 IST

शिक्षक घेताहेत ‘शोध नैपुण्याचा’

ठळक मुद्देशिक्षकांनीच स्वत:च अभ्यासक्रम तयार केलामाफक दरात पुस्तके उपलब्ध दिली करूनस्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या द्ृष्टीने पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाशी सांगड

चुडामण बोरसेजळगाव - ज्ञान दिल्याने ज्ञान हे वाढत असते... हे ब्रीद घेऊन बोदवड (जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी  स्वयंस्फूर्तीने ‘शोध नैपुण्याचा’ हा  अभिनव उपक्रम सुरु केला  आहे. यासाठी  शिक्षकांनी वर्गणी गोळा करुन दोन पुस्तकांची निर्मिती केली आहे.  चांगला विद्यार्थी आणि चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षक काय करु शकतात, याचे एक आदर्श उदाहरण बोदवडच्या शिक्षकांनी उभे केले आहे.   आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. भविष्यात आपला  विद्यार्थी या आव्हानाला यशस्वीपणे सामोरा जावा आणि मुख्य म्हणजे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि या परीक्षांची तयारी इयत्ता पहिलीपासून व्हावी, यासाठी  हे अभियान सुरु करण्यात आले आहे.   ‘ज्ञानदीप अभियान’ असे या अभियानाचे  नाव देण्यात आले  आहे.   आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व क्षमता याची शिक्षकांना माहिती असते.  यासाठी शिक्षकांनीच स्वत:च अभ्यासक्रम  तयार केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या द्ृष्टीने पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाशी सांगड घालून या ज्ञानरचनावादी पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.असे आहे अभियानया अभियानात बोदवड तालुक्यातील सर्व जि.प. शाळा शाळांमधील  इ.१ ली ते इ.७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा  घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्वत:चा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. सर्व शाळांमधून अधिकाधिक विद्यार्थी ही परीक्षा देऊ  शकतील, यासाठी अतिशय माफक दरात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी गरज पडल्यास शिक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे.अभियानाची वैशिष्ट्येइयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टॅलेंट सर्च,  आॅलिंपियाड,  ब्रेन डेव्हलपमेंट यासारख्या परीक्षांचा सराव पहिलीच्या वर्गापासूनच व्हावा, यासाठी या शिक्षकांचे प्रयत्न सुरु आहेत.  आजकाल  कर्मचारी  ते जिल्हाधिकारी पदापर्यंतची निवड ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होते. ग्रामीण भागातील शाळांमधील मुलांना ही संधी मिळावी आणि  शिक्षकांचाही गुणवत्ता विकास व्हावा, यासाठी शिक्षकांनी मिळून हा उपक्रम सुरु केला आहे.