जळगाव : भडगाव येथे अन्न औषध प्रशासनाने पाचोरा येथील व्यापाऱ्याचा सुमारे १२ लाखांचा गुटखा आणि वाहन जप्त केले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली असून भडगाव पोलिसात वाहन जमा करण्यात आले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, भडगाव पोलीस हे पेट्रोलिंग करीत असताना एका चारचाकी वाहनातून (एमएच १९- व्हीएम ४८८९) गुटखा नेला जात असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तो भडगाव पोलीस स्टेशनला आणून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला कळविले. यानुसार संबंधित अधिकारी हे भडगाव पोलीस स्टेशनला आल्यावर त्यांनी चौकशी करून ही कारवाई केली.गुटखा हा राज गोविंददास पंजाबी (रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) यांचा असून विमल पानमसाला व व्ही १ तंबाखूचे प्रत्येकी ३० पोते इतका साठा जप्त करण्यात आला. ११ लाख ८० हजार इतकी याची किंमत आहे. अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी हा साठा ताब्यात घेतला.ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) भु. दि. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील व अनिल गुजर यांनी केली. मोठी कारवाई केल्याने भडगावात खळबळ उडाली.
भडगाव येथे पकडला १२ लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:50 IST
भडगाव येथे अन्न औषध प्रशासनाने पाचोरा येथील व्यापाऱ्याचा सुमारे १२ लाखांचा गुटखा आणि वाहन जप्त केले.
भडगाव येथे पकडला १२ लाखांचा गुटखा
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाची कारवाई१२ लाखांचा गुटखा व वाहन केले जप्तकारवाईमुळे भडगावात उडाली खळबळ