नशिराबाद: येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिराद्वारे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष जनार्दन माळी, संचालक ॲड. मोहन देशपांडे उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार स्वर्गवासी गुरुवर्य वाय. जी. महाजन, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी संचालक मंडळाद्वारे सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने गुगल मीटद्वारा इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेतला. यात लुब्धा किरण चौधरी, चैताली भूषण कोलते, हर्षल राजेश सपकाळे, दर्शन सुधीर पाटील, लावण्या संजय वाघुळदे, श्रावणी खरे, श्रद्धा व प्रसाद सराफ, तनुजा पाटील, प्रनिल पाटील, स्वरा फेगडे, पुष्पांजली महाजन, अथर्व पंड इ. विद्यार्थ्यांनी व शिक्षक मंगला चौधरी यांनी गुरुपौर्णिमेबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन शीतल चावरे व तुषार रंधे यांनी केले.