शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

गुरू नेहमी तुमचे जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी मदत करतात - अद्वैत दंडवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:16 IST

गुरू म्हणून जे बोलतो ते कृतीत आणले तरच इतरांचा विश्वास बसतो

जळगाव : गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा असते़ गुरू ही कोणी एक व्यक्ति नसते, तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्ति भेटत असतात जे तुमच जगणे अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यास मदत करतात, असे विचार अनाथांसाठी आनंदघर हा उपक्रम राबविणारे अद्वैत दंडवते यांनी मांडले़ गुरूपौणिर्मेच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते़दंडवते यांनी सांगितले की, कामाच्या प्रेरणेच्या बाबतीत सांगायचे झाले तर महात्मा गांधी यांच्या जीवनातून खरी प्रेरणा मिळाली़ त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांमधून गांधीजी कसे जगले, असे खूपच कमी लोक असतात जे स्वत:वर टीका करू शकतात, गांधीजी त्यातील एक होते़ गांधीजी नेहमी सांगायचे ज्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल, द्विधा मनस्थितीत असाल तर नेहमी आर्थिक दुर्बल अशा व्यक्तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा, आपण जे करणार आहोत त्यामुळे त्याच्या जीवनात काही बदल होणार आहे का, हा विचार प्रेरणादायी होता़ त्या विचारातूनच कचरा वेचक मुलांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आनंद घर च्या माध्यमातून यामुलांचे जगणे आनंदी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो़जे आपण बोलत ते आपल्या कृतीत येते का हे बघणे अतिशय महत्त्वाचे आहे़ माझ्या मुलांसाठी सुद्धा तोच आदर्श असावा, मी जे बोलतो ते कृतीत येते का हे ते पाहाता व त्यादृष्टीनेच त्यांचा माझ्यावर विश्वास असतो, गुरूंसाठी हे महत्त्वाचे आहे़जगण्याचा मार्ग शोधायला मदतगुरू हा केवळ शिक्षण व्यवस्थेतूनच तुम्हाला मिळतो असे नाही, अनेक लोक तुमच्या आजुबाजूला असतात जे तुम्हाला जगण्याचा मार्ग शोधायला मदत करतात़ गुरू तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत असतात, असे अद्वैत दंडवते यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव