शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : तोफा थंडावल्या, उद्या मतदान; दुरंगी लढत होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:58 IST

अखेरच्या दिवशी उमेदवारांची तारांबळ

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून भाजप-शिवसेना युती व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात लढत होत आहे. मंगळववारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील हे प्रथमच लोकसभा निवडणूक रिंगणात असून त्यांची लढत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासोबत होत आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांच्यासह एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.संपूर्ण प्रचारादरम्यान ‘मोदी’ सरकार केंद्रबिंदू राहिले. युतीने मोदी सरकारच्या यशोगाथा तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडीने मोदी सरकारच्या अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात आक्रमकपणा दिसून आला नाही तर मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मिटिंगवर सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात भर दिला.निवडणुकीचा प्रचार रविवारी संध्याकाळी संपला. अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती.आता मतदानापर्यंत मुका प्रचार सुरू राहणार असून १९ लाख २५ हजार ३५२ मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.मतदान वेळ सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंतमतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदान केंद्रात ६ वाजेपर्यंत रांगेत असणाºया प्रत्येक मतदारांना मतदान केंद्रातील अधिकारी एक कूपन देईल. ज्यांच्याजवळ कूपन असेल त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.पोलिंग पार्टी आज रवाना होणारमतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीला (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) सोमवारी ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्याचे वितरण केले जाईल. विधानसभानिहाय करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम परिसरात साहित्याचे वितरण करण्यात येईल. सर्व पोलिंग पार्टी दुपारपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचतील. मतदानाची व्यवस्था करतील आणि तसा अहवाल सादर करतील.सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’मतदान केंद्रावर सकाळी ६ वाजता मॉक पोल घेण्यात येईल. यात सर्व उमेदवार व नोटांसह ५० मत टाकण्यात येतील. हे मॉक पोलिंग एजंटच्या उपस्थितीत होईल. यासाठी पोलिंग एजंटला कुठल्याही परिस्थितीत सकाळी ६.१५ वाजेपर्यंत मतदान केंद्रात पोहोचावे लागेल. ते न आल्यास मॉक पोल सुरू केले जाईल. ते ७ वाजेपर्यंत चालेल. ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव