शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

जळगावात शंभर रुपयांसाठी शस्त्रधारी गुंडांचा घरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:36 IST

फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपये दिले नाही म्हणून ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर २५ ते ३० जणांच्या सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता घडली. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

ठळक मुद्दे आयोध्या नगरात थरारदोन तरुण गंभीर जखमीपोलिसांकडून धरपकड सुरु

आॅनलाईन लोकमत

जळगाव दि,२७ :  फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपये दिले नाही म्हणून ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर २५ ते ३० जणांच्या सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता घडली. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ललित चौधरी या तरुणाने  एका फायनान्सच्या माध्यमातून मोबाईल घेतला होता. त्याचा हप्ता एक हजार ७०० रुपये होता. हा हप्ता घेण्यासाठी प्रविण चंद्रकांत वाघ हा आला असता ललित याने दुपारी एक हजार सहाशे रुपये दिले व त्यातील शंभर रुपये बाकी ठेवले होते. त्यामुळे या कर्मचाºयाचा ललित याच्याशी वाद झाला. त्यानंतर प्रविण वाघ हा रवी भोई, धनराज कोळी, आबु भालेराव, मोनुसिंग बावरी, संदीप वारुळे, शुभम सपकाळे,  दर्शनसिंग टाक, किरण गव्हाणे, प्रेमसिंग टाक, अविनाा नन्नवरे, अश्विन सोनवणे, निखिल बडगुजर व भैय्या भोई यांच्यासह ८ ते १० जण घेऊन सायंकाळी ललित याच्या घरी आला. या टोळक्याने  थेट कुटुंबावर हल्ला चढविला. ही गर्दी पाहून मदतीला धावून आलेल्या अभिषेक व राकेश या दोघांवर जमावातील टोळक्याने तलवार हल्ला केला तर ललित याची बहिण पल्लवी कांचन येवले,  दक्ष येवले (वय ५), स्वरा (२) व पत्नी भूमिका आदींनाही दुखापत झाली.एकाचा प्रकृती चिंताजनकया हल्ल्यात जखमी झालेल्या अभिषेक याची प्रकृती चिंताजनक असून त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे तर राकेश याच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.घरातील सामानाची नासधूसया टोळक्याने घरातील सामानाची नासधूस केली असून घराच्या खिडक्या, कुलर, पलंग, पाण्याचा इलेक्ट्रीक पंप व सायकलची तोडफोड केली आहे. या टोळक्याच्या दहशतीमुळे कुटुंब भयभीत झाले आहे. 

अन् मोठी दुर्घटना टळलीघटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, शरद भालेराव, विजय नेरकर व किशोर पाटील यांना तत्काळ घटनास्थळी रवाना केले. पोलीस आल्याचे पाहून टोळक्याने तेथून पळ काढला. दरम्यान, पोलीस पोहचले नसते तर एखाद्याचा खूनच झाला असता असे गल्लीतील लोकांनी सांगितले.  पोलिसांनी धरपकड मोहीम सुरु केल्यानंतर मुख्य आरोपी प्रविण हा हाती लागला. अन्य संशयितांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. दरम्यान, याप्रकरणी संगिता विकास चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.