शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलणार-विजयी आभार सभेत गुलाबराव पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:38 IST

शहरात विकास करून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार गुलाबराव पाटील यांनी विजयाच्या आभार सभेत दिली.

ठळक मुद्देजनतेच्या आशीर्वादाने मी धन्य-धन्य झालोहे ट्रेलर, मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर घेऊ सभाभरपावसात झालेली आठवणीतील सभा

धरणगाव, जि.जळगाव : नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी धनरुपाने प्रतिष्ठेची करूनदेखील जनतेने मला भरभरुन आशीर्वाद दिला. जे जन करू शकले हे धन करू शकले नाही. त्यांच्याबद्दल न बोलता आपण विकासावर बोलू, असे सांगत शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांची घरे मला त्यांच्या नावावर करावयाची आहे. तसेच शहरात विकास करून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार गुलाबराव पाटील यांनी विजयाच्या आभार सभेत दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सभेनंतर गुलाबराव पाटील यांची ही भरपावसात झालेली सभा आठवणीतील सभा राहिली. या सभेत प्रेक्षक जागा मिळेल तिथे उभे राहून उत्सुकतेने ऐकत होते.येथील साने पटागंणावर शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा अभीष्टचिंतन सोहळा व विजयी आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या खोळंब्याने सभा उशिरा सुरू झाली. यावेळी गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, गजानन पाटील, नगरसेवक शरद तायडे, जि.प.सदस्य प्रताप पाटील, जि.प.सदस्य गोपाल चौधरी, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, माजी नगराध्यक्ष उषा वाघ, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, तालुकाप्रमुख गजानन पाटील, चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेना गटनेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चोधरी, विलास महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन, रत्ना धनगर, महिला तालुकाप्रमुख जनाबाई पाटील, किशोर कंखरे, तौसिफ सलीम पटेल, गायत्री जोशी, हेमांगी अग्निहोत्री यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पाऊस असताना झालेली ही सभा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आठवण करून देत होते. सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी, तर आभार किरण अग्निहोत्री यांनी मानले.हे ट्रेलर, मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर घेऊ सभाया विजयी सभेत पाऊस सुरू असताना सभा ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र लोकांना बसायला जागा नसल्याने गुलाबराव पाटील यांनी सभा आटोपती घेत हे विजयी सभेचे फक्त ट्रेलर असून मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विजयी सभा पूर्णपणे होईल व त्या सभेत पूर्ण भाषणाची फटकेबाजी ऐकायला मिळेल, असे सांगितले.अभिनंदनाचा वर्षावशिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा वाढदिवस असल्याने त्यांना भेटणाऱ्यांची जिल्हाभरातून दिवसभर गर्दी होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणDharangaonधरणगाव