रावेर, जि.जळगाव : गुजरात राज्यातील मोदीनगर-आमराईवाडी, ता.अहमदाबाद येथील एका ७४ वर्षीय वृद्धेचा श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरासमोर असलेल्या भोकर नदीपात्रातील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊला उघडकीस आली. ही महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होती. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तालुक्यातील तामसवाडी येथे गत चार-पाच दिवसांपासून आपली वितभर पोटाची भीक मागून खळगी भरणारी व रात्री श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरात झोपणाऱ्या ७४ वर्षीय अज्ञात वृध्देचा भोकर नदीपात्रातील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना १४ सप्टेंबर रोजी तामसवाडी शिवारातील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरासमोरील भोकर नदीपात्रात असलेल्या डोहात घडली. या महिलेजवळ असलेल्या निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रावरून सदरील महिलेची ओळख पटली आहे. चंपाबाई वासुदेव राठोड (वय ७४, रा. १५, बलरामची चाळ, कर्णावती फ्लॅट, मोदीनगरच्या पाठीमागे, अमराईवाडी, ता.जि.अहमदाबाद, गुजरात) या असल्याचे स्पष्ट झाले. ही महिला तामसवाडी येथे येण्यापूर्वी रसलपूर येथे भटकंती करून आपली गुजराण करीत असल्याची चर्चा आहे.तामसवाडी येथील पोलीस पाटील सुलभा राजेश रायमळे यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांनी गुजरात पोलिसांमार्फत त्या वृद्धेच्या आप्तेष्टांशी संपर्क साधला असून, मयत वृद्धेचा मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयाचे शवविच्छेदन गृहात राखून ठेवण्यात आला आहे.रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अर्जुन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
गुजरातमधील वृद्धेचा रावेरनजीक भोकर नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 19:52 IST
एका ७४ वर्षीय वृद्धेचा श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरासमोर असलेल्या भोकर नदीपात्रातील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊला उघडकीस आली.
गुजरातमधील वृद्धेचा रावेरनजीक भोकर नदीत बुडून मृत्यू
ठळक मुद्दे मतदान कार्डवरून पटली ओळखरावेर तालुक्यातील तामसवाडी येथील घटना