लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्यावतीने मंगळवारी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नेट, सेट मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रम, प्रश्न सोडविताना वापरायच्या विविध क्लुप्त्या आदींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्या डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मागदर्शक म्हणून धुळे येथील प्रा. के.एम.बोरसे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक समन्वयक प्रा.डॉ.अनिल एम.नेमाडे यांनी केले.
२५७ विद्यार्थ्यांचा सहभाग
उद्घाटनानंतर प्रा.के.एम. बोरसे यांनी विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयाच्या नेट, सेट परीक्षेचे स्वरूप स्पष्ट केले. कार्यशाळेत विद्यापीठ क्षेत्रातील २५७ विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. कमरिन शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.मिनल पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा.डी.डी.नारखेडे, प्रा.योगेश खैरनार, डॉ.मोनाली खाचणे, प्रा.पुनम पाटील प्रा.वृषाली ठाकरे यांनी परिश्रम घेतले.