भालोद, ता. यावल : म. फुले कृषी विद्यापीठांतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूत मिलिंद चंद्रकांत चौधरी आणि अभिषेक राजेंद्र कोळी यांनी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभ्यास अंतर्गत कोरोना महामारीसंदर्भात सुरक्षिततेचे उपाय, लसीकरण याविषयी माहिती दिली. शेतावर जाऊन बीजप्रक्रिया, माती परीक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, चारा प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यायची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस पाटील, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्राचार्य शैलेश तायडे, उपप्राचार्य पी. एस. देवरे, कार्यक्रम अधिकारी विशाल दळवी, प्रतीक्षा सावळे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. फाफळे यांचे मार्गदर्शन लाभले.