शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी ‘पालक’ व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:14 IST

विकास पाटीलजळगाव शहराच्या विकासासाठी राजकारण करणार नाही तसेच गाळेधारकांनी निर्धास्त रहावे असे राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ दिवसांपूर्वीच अमृत योजनेच्या शुभारंभप्रसंगी आपल्या भाषणात सांगितले. त्यानंतर खरीप व पाणी टंचाईच्या आढावासाठी ते जळगावात येवून गेले. यावेळीही त्यांनी गाळेधारकांना मदतीचे आश्वासन दिले तसेच कपाशीच्या देशी वाणावरील किंमतीचे बंधन ...

विकास पाटीलजळगाव शहराच्या विकासासाठी राजकारण करणार नाही तसेच गाळेधारकांनी निर्धास्त रहावे असे राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ दिवसांपूर्वीच अमृत योजनेच्या शुभारंभप्रसंगी आपल्या भाषणात सांगितले. त्यानंतर खरीप व पाणी टंचाईच्या आढावासाठी ते जळगावात येवून गेले. यावेळीही त्यांनी गाळेधारकांना मदतीचे आश्वासन दिले तसेच कपाशीच्या देशी वाणावरील किंमतीचे बंधन उठविण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. २० दिवसातील या तीनही आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व गाळेधारक नाराज झाले आहेत.पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालक झाले पाहिजे. जिल्हा व शासन यांच्यातील दुवा बनून जिल्ह्याचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावावे या हेतूनेच पालकमंत्री व पालक सचिव ही दोन्ही पदे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्याचे दुदैव आहे की या दोन्ही पदांकडून जिल्हावासीयांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.जळगाव शहरातील गाळेधारकांची आश्वासनावर बोळवण सुरु आहे. धक्कादायक म्हणजे एक दिवस आधी पालकमंत्री म्हणतात अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याकडून गाळेधारकांच्या प्रश्नावर अभ्यास सुरु असून लवकरच दिलासा मिळेल अन् दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेला नगर विकास विभागाकडून गाळेप्रश्नी शासनस्तरावर कोणताही अडसर नाही. पुढील कार्यवाही करावी, असे आदेश धडकतात. शासनाच्या या आदेशाने गाळेधारकांची घोर निराशा झाली आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी काय अहवाल दिला, त्याबाबत कोणतीही माहिती गाळेधारकांना विश्वासात घेवून देण्यात आली नाही. थेट कार्यवाहीचे आदेशच मनपात धडकले. गाळेधारकांना दिलासा द्यायचा नव्हता तर निर्धास्त राहण्याचे आश्वासन कशासाठी दिले? असा सूर आता गाळेधारकांमधून उमटत आहे.केवळ गाळेप्रश्नच नव्हे तर हुडको कर्ज फेड, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटीतील १८ कोटीचा नगरविकास विभागाकडे प्रलंबित असलेला प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. समांतर रस्त्यांचा ‘डीपीआर’ तीन वेळा बदलण्यात आला. त्यानंतर तो २३ मार्चपासून मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे, महिना होत आला तर तो मंजूर झालेला नाही. महामार्गावर निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. असे असतानाही हा डीपीआर मंजुरीसाठी पालकमंत्री प्रयत्नशील असल्याचे दिसत नाही. त्यांनी आपले वजन वापरले असते तर कदाचित समांतर रस्त्यांचा व तरसोद ते चिखली दरम्यानच्या चौपदरीकरणास आतापर्यंत प्रारंभ झाला असता. ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांची तळमळ दिसते तशी जळगावसाठी दिसत नाही. केवळ महोत्सव, उत्सव, भूमिपूजन, कार्यालयांचे उद्घाटनांसाठी त्यांचा दौरा असू नये. शासन दरबारी जिल्ह्याचे रखडलेले प्रश्न त्यांनी मार्गी लावावे व खरोखर जळगावकरांचे पालक व्हावे, अशी जिल्हावासीयांना अपेक्षा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव