शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाढती हिंमत, लॉकडाऊनमध्येही अवैध मद्याचा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:45 IST

जळगाव : लॉकडाऊन असताना हनुमान नगर येथे बेकायदेशीर देशी दारुची विक्री करणाऱ्या अर्जुन पोपटराव आहेर (३५, रा. हनुमान नगर, ...

जळगाव : लॉकडाऊन असताना हनुमान नगर येथे बेकायदेशीर देशी दारुची विक्री करणाऱ्या अर्जुन पोपटराव आहेर (३५, रा. हनुमान नगर, मू. रा. पिंपळगाव, जि. नाशिक) या दुकानाच्या व्यवस्थापकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याच्या ताब्यातील १७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.लॉकडाऊन असतानाही अवैधपणे मद्यविक्री सुरुच असून यावर पोलिसांची करडी नजर आहे. अशी विक्री सुरु असल्याचे कळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपी अर्जुन आहेर हनुमान नगरात हा भाडेकरु म्हणून राहतो.तो कालिंकामाता मंदीरासमोर डी. एस. साळुंखे यांच्या देशी दारुच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतो. लॉकडाऊन काळात त्याने दुकानातून सुमारे १७ हजार ४७२रुपए किंमतीचे देशी दारु विकत घेतली. घराजवळच जिन्याच्या आडोशाला बेकायदेशीर व विनापरवाना देशी दारुची विक्री करीत असताना त्याला पोलिसांनी पकडले.सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, असीम तडवी, सचिन पाटील, निलेश पाटील यांनी करवाई केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी मद्य विक्री व लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव