शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

गहाणवटीचा ऐवज डोके : बसंती, उस कुत्ते के सामने मत नाचना बसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:33 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार.

ज्याने ‘शोले’ चित्रपट पाहिलेला नाही, असा माणूस भारतवर्षाच्या इतिहासात, वर्तमानात आणि भूगोलावर शोधूनही सापडणार नाही. एकवेळ रामायण, महाभारत, बायबल, कुराण इत्यादी ग्रंथ माहीत नसलेली व्यक्ती सापडेल, पण ‘शोले’ न पाहिलेली व्यक्ती सापडणे म्हणजे ‘गुल बकावलीचं फूल’ सापडण्यासारखं आहे. (आता, गुलबकावली म्हणजे काय? असा प्रश्न जर, आजीच्या तोंडून गोष्टी न ऐकताच लहानाचा मोठे झालेल्या मानवाने मला विचारला, तर मला, आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली, मी त्याच्यावर खटला भरीन.)चाळीस, पंचेचाळीस वर्षे होत आलीत तरी लोक न थकता शोले बघताय आणि त्याच्याबद्दल न थकता बोलताय अशी ‘शोले’ ही देदीप्यमान, अजरामर कलाकृती. ती बघा २०-२५ झोपड्या आणि एक ठाकूरची गढी, उर्फ दुमजली वाडा असलेली रामगढ नावाची वस्ती. नायकाला दारू पिऊन वर चढून आत्महत्येचं नाटक करता येण्यासाठी उभारलेली उंचावरची पाण्याची टाकी. तिच्या साक्षीने समोरच्याच विहिरीवरून, मातीच्या घागरींमधून, पाणी भरून नेणाऱ्या स्त्रिया. ‘मातीच्या’ घागरीतूनच अशासाठी, की जर घोड्यावरून खदडक खदडक करत डाकू आलेत, तर त्यांना एखाद्या गोरीच्या डोक्यावरील घड्याला नेम धरून गोळी मारता यायला हवी. घड्याला छानसं कलात्मक गोल भोक पडून, त्यातून पाण्याची धार लागणार. डाकूंना उगीचच गोळ्या खर्ची घालाव्या लागू नयेत म्हणून पनघटवरच्या उरलेल्या पनीहारीनी डोक्यावरच्या मातीच्या घागरी स्वत:च किंचाळत फोडून टाकत सैरावैरा पळणार. हजार घरांच्या वस्तीला पुरून उरेल एवढी मोठी पाण्याची टाकी उशाशी असताना, २०-२५ झोपड्या असलेल्या रामगढवासी स्त्रिया विहिरीवरून पाणी का भरतात? काय करणार बिच्चाºया, त्या पाण्याच्या टाकीला नळच जोडलेले नाहीत. बरं, नळ असते तरी काय उपयोग, पाणी खालून वर टाकीत चढवायला विजेची मोटार नको का? पण गावात वीजच नाही. वीज असती तर सगळ्यात आधी श्रीमंत ‘ठाकूर की हवेली’ उजळून निघाली नसती का? पण गावातच वीज नाही म्हणून हवेलीतही वीज नाही. वीज असती तर ठाकूरची वीजवंचित विधवा सून बिचारी उगाचंच संध्याकाळी गॅसबत्तीची ज्योत मोठी करून पेटवण्याच्या आणि सकाळ झाली, की ज्योत लहान करत विझवण्याच्या कामावर नेमल्यासारखी दिसली असती का? ‘गब्बरसिंग’ हा वेडसर दाखवला आहे. ते योग्यच आहे. गावात वीज नाही, चक्की नाही, आणि हे बाळ विचारतं, ‘ये रामगढ वाले कौनसी चक्कीका पिसा आटा खाते है रे’. वेडा कुठला! वेडा नाही तर काय, ज्या घरात विधवा सून आणि तिचा म्हातारा सासरा, असे फक्त दोनच व्यक्ती आहेत. अशा घरातल्या सासºयाचे दोन्ही हात छाटून टाकायचे, म्हणजे सगळीच कल्पनातीत पंचाईत की! नाही म्हणायला एक उत्तम केले आहे. विरू आणि बसंती ह्यांचे प्रेम तडीस जाऊ दिले आहे. पण ठाकूराच्या विधवेचं प्रेम काही सफल होऊ दिलेलं नाही. तिथे जय ह्या नायकाचा मृत्यू अचूकपणे मदतीला धाऊन आलाय. कल्पना करा ना राव, खानदानी ठाकूरच्या घरातील ‘विधवेचा पुनर्विवाह’ दाखवला असता, तर समस्त भारतातील ठाकूरांनी ‘शोले’लाच आग लावून नसती का टाकली. गहाणवटीतली डोकीसुद्धा जपावी लागतात राव ! (अपूर्ण)