शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी गावांमधून गोवर-रुबेला लसीकरणास प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:38 IST

यावल , जि.जळगाव : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत आणि अति दुर्गम भागात वसलेल्या जामन्या, गाडऱ्या, लंगडा आंबा व उसमळी ...

ठळक मुद्दे९५ विद्यार्थ्यांना देण्यात आली गोवर-रुबेला लसलसीकरणात आदिवासी पालकांनीही दाखविला उत्साह

यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत आणि अति दुर्गम भागात वसलेल्या जामन्या, गाडऱ्या, लंगडा आंबा व उसमळी या आदिवासी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शुक्रवारी झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणास प्रचंड प्रतिसाद मिळाला. ९५ टक्के विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली. आदिवासी पालकांनी या राष्ट्रीय मोहिमेस प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ६२९ विद्यार्थ्यांपैकी ५९५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.तालुक्यात सध्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या जामन्या, गाडºया, लंगडाआंबा आणि उसमळी ही गावे अति दुर्गम भाग म्हणून ओळखली जातात. शुक्रवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे हे पथकासह आदिवासी गावात पोहचले. सुरवातीस डॉ.बºहाटे यांनी गोवर आजाराची लक्षणे व त्यापासून बालकांना होणाºया अपायाची माहिती देवून आजार समूळ नष्ट करण्यासाठी गोवर-रुबेलाचे लसीकरणाची गरज असल्याचे सांगितले.आदिवासी पालकांनी आपल्या मुलास लसीकरण करण्याासंदर्भात प्रोत्साहीत केले. गाडºया येथील शाळेतील ११४ विद्यार्थ्यापैकी १०७, जामन्या ४५० पैकी ४२६, उसमळी येथील ४५ पैकी ४३ तर लंगडा आंबा येथील २० पैकी १९ बालकांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर बालकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पथकातील डॉ.गोरव भोईटे, डॉ.ठाकरे, ग्रामसेवक रुबाब तडवी, पर्यवेक्षिका भूमिका सोनवणे, आरोग्य सेविका महेमुदा तडवी, शोभा जावळे, अनिता नेहेते, शाबदान तडवी, अरविंद जाधव, मुबारक तडवी, बालाजी कोरडे, बारी यांच्यासह सरपंच शेपाबाई बारेला, पोलीस पाटील तेरसिंंग बारेला, गाडºयाचे मुख्याध्यापक अरूण बारेला, लंगडा आंबाचे भायाराम बारेला, उसमळीचे लकड्या बारेला यांच्यासह शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. एकीकडे काही ठिकाणी गैरसमज पसरवले जात असताना दुर्गम भागातील आदिवासी गावात मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आदिवासी बांधवांचे प्रशासनाकडून कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यYawalयावल