शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘रेशन’वर हरभरा व उडीद डाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:04 IST

दिवाळीनिमित्त निर्णय

ठळक मुद्दे३५ रुपये प्रती किलोने होणार विक्रीजळगाव जिल्ह्यासाठी वाढीव मागणी

जळगाव : दिवाळीनिमित्त राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानित दराने हरभरा व उडीद डाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यानुसार जिल्ह्यासाठी २८६ मेट्रिक टन हरभराडाळ व १४३ मेट्रिक टन उडीदडाळ उपलब्ध झाली आहे. जिल्ह्याची मागणी मात्र जास्त असल्याने आणखी मागणी नोंदविली जाणार आहे. ३५ रुपये प्रती किलोने लाभार्थ्यांना याचे वितरण होणार आहे.दिवाळीनिमित्त अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानित दराने डाळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने योजना आखून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रिया राबवून ‘मिलर्स’ची नियुक्ती केली आहे. नाफेडने ठरवून दिलेल्या वखार महामंडळाच्या गोदामांमधून हरभरा व उडदाची उचल करून त्यापासून डाळ तयार करून ती डाळ एक-एक किलोच्या थैल्या करून प्रत्येक जिल्ह्याला पुरवठा करावयाची आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.रेशनसाठी डीबीटीच्या पर्याय अद्याप जिल्ह्यात लागू नाहीपात्र लाभार्थ्याला अन्नधान्य, साखर व केरोसीन हे आधार नोंदणी करून ई-पॉस मशिनद्वारे दिले जात आहे. आता डायरेक्ट बेनीफिट ट्रान्सफर (डीबीटी) (कॅश) या पर्यायाचा विचार करावा, असे निर्देश केंद्र शासनाने सर्व राज्यांना दिले आहेत. मात्र राज्य शासनाने डीबीटी (कॅश) व डीबीटी (कार्इंड) या पर्यायांची सांगड घालून लाभार्थ्यांना कॅश किंवा धान्य यापैकी त्यांच्या पसंतीचा एक पर्याय निवडण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.हा पर्याय सध्या फक्त अन्नधान्य वितरणासाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याचा निर्णय २१ आॅगस्ट २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला आहे. मात्र मुंबई व ठाणे येथील दोन दुकानांमध्येच प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सध्या सुरू आहे, जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी कधी होणार? याबाबत काहीही सूचना जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत.जळगाव जिल्ह्यासाठी वाढीव मागणीजिल्ह्यात अंत्योदय योजनेचे १ लाख ३७ हजार ५४४ कार्डधारक तर प्राधान्य कुटुंब योजनेचे २२ लाख ६३ हजार ५५ सदस्य लाभार्थी आहेत. जिल्ह्यासाठी २८६ मेट्रिक टन हरभरा डाळ व १४३ मेट्रिक टन उडीदडाळ उपलब्ध झाली आहे. ती अपुरी असल्याने जिल्हा पुरवठा विभागाने ५०१.२ मेट्रिक टन चनाडाळ तर ३८५.२ मेट्रिक टन उडीद डाळीची मागणी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव