जळगाव : मनपाने दांडेकरनगर झोपडपट्टीधारकांसाठी एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत (आयएचएसडीपी) योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे घरकुलांचे सुरू केलेले काम मक्तेदाराने केलेली प्रतिघरकूल 2 लाख रुपये वाढ मंजूर होण्याची प्रतीक्षा असल्याने रखडले आहे. मनपातर्फे पिंप्राळा हुडको येथेच आयएचएसडीपी योजनेंतर्गत 472 घरकुलांची योजना राबविली जात आहे. त्यापैकी 260 घरकुलांचे कामकाज पूर्ण होत आले आहे. मात्र उर्वरित इमारतींचे काम सुरू झालेले नाही. त्यासाठी आधी तेथे स्थलांतरित करून आणलेल्या झोपडपट्टीधारकांच्या झोपडय़ा होत्या. त्या बाजूला सरकवून काम सुरू करण्यास या झोपडपट्टी धारकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे काम सुरू करण्यात अडचण निर्माण झाली होती. बांधकाम झालेल्या घरकुलांचे वाटप करावे मग उर्वरित काम सुरू करावे, अशी मागणी करीत या झोपडपट्टीधारकांनी जागा मोकळी करण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे अखेरीस आयुक्त संजय कापडणीस यांनी या ठिकाणी जाऊन झोपडपट्टीधारकांशी चर्चा केल्यावर जागा मोकळी करण्यात आली. प्राथमिक तयारीही बाकी या मोकळ्या झालेल्या जागेवर उर्वरित 212 घरकुलांसाठी 3 इमारतींचे काम बाकी आहे. जागा मोकळी होईर्पयतच्या काळात या जागेवरील मातीचे परीक्षण, करून घेऊन नकाशा तयार करण्याची प्रक्रिया संबंधित अधिका:यांनी करणे अपेक्षित होते. मात्र जागा मोकळी झाल्यावर आता पुढील कामाला सुरुवात झाली आहे. माती परीक्षणाचा अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतर नकाशा केला जाणार असल्याचेही समजते. वाढीव निधीसाठी प्रतीक्षा या घरकूल योजनेचे काम औरंगाबाद येथील निर्माण गोल्ड स्ट्रर लि. यांना देण्यात आले आहे. त्यांनी जागा उपलब्ध नसल्याने काम रखडल्याने सुधारीत प्रकल्प अहवालानुसार प्रती घरकूल 2 लाख रुपये याप्रमाणे सुमारे 4कोटी 25 लाख इतक्या वाढीव रक्कमेची मागणी केली आहे. शासनाकडून त्यावर काय निर्णय घेतला जातो? याची प्रतीक्षा असल्याने मक्तेदाराकडून धीम्यागतीने काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.