शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची शप्पथ तुम्हाला राज्यपाल करणार...खडसेंचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:16 IST

‘तुम्हाला राज्यपाल करणार,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा गौप्यस्फोट एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

मतीन शेख

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर विधिमंडळ अधिवेशनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची आॅफर दिली होती. माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, ‘तुम्हाला राज्यपाल करणार,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटी चेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी आम्ही दोघेच अँटी चेंबरला होतो. त्यांनी मला राज्यपालपदाची आॅफर दिली होती. मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचं फडणविसांनी म्हटलं होतं, असं खडसे यांनी शनिवारी हा गौप्यस्फोट केल,. तर एका वृत्त वाहिनीवरही सांगितले.राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. तेही झालं नाही. त्यानंतर परत विधान परिषदेसाठीही नाव पाठवलं असे सांगितले, जी नावे दिली ती वगळून दुसरीच चार नावं आली. त्यावेळी मी म्हटलं जमत असेल तर करा, उगाच खोट्या अपेक्षा दाखवू नका.कालच खडसें आमचे नेते आहेत, त्यांच्यावर काही बोलणार नाही, असे सांगत मी घरातील भांडी रस्त्यावर धुत नाही, असे सांगून खडसेंना टोला लगावला होता तर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, असे फडणवीस यांनी सांगितले होते. यावरही खडसे यांनी देवेंद्र फडणवीस हे चांगले ड्रायक्लिनर असल्याचा पुनरुच्चार केला होता. परत आज खडसेंनी फडणविसांवर हल्लाबोल केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर