शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकिय सेवा सोमवारपासून महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:38 IST

गरीबांच्या खिशाला बसणार आर्थिक झळ

 जळगाव : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारपासून वैद्यकिय सेवा महागणार असून त्यामुळे गरीबांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. वैद्यकिय सेवेचे नवीन दर तसे २०१७ पासून लागू करण्याचे शासनाचे परिपत्रक आहे, मात्र जळगावला नवीनच वैद्यकिय महाविद्यालय मंजूर झाल्याने हे दर लागू केलेले नव्हते.दीड वर्षापूर्वी येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर झाले. सध्या त्याचा जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीतच कारभार सुरु आहे. २०१७ मध्ये रुग्णसेवेचे दर वाढलेले असले तरी शासकीय महाविद्यालयात जिल्हा रुग्णालयाच्या दरातच रुग्णांची तपासणी व उपचार केले जात होते. बाह्यरुग्ण विभागाचे (केसपेपर) शुल्क आता २० रुपये करण्यात आले आहेत. पूर्वी दहा रुपये आकारले जात होते. दहा रुपयात मिळणारे जेवण आता ३० रुपयात मिळणार आहे. त्याशिवाय आंतररुग्ण (दाखल) विभागाचेही दर ३० रुपये करण्यात आले आहेत. पूर्वी हे दर १५ रुपये होते, त्यात दुपटीने वाढ झाली आहे. सीटीस्कॅनच्या दरात ५० तर इसीजी व एक्स रे च्या दरात २० रुपयांनी वाढ झालेली आहे.दीड वर्ष रुग्णांचा फायदामहाराष्टÑातील सर्वच शासकीय महाविद्यालयात हे नवीन दर २०१७ पासून लागू झालेले आहेत. जळगावचे वैद्यकिय महाविद्यालय नवीन असल्याने वाढीव दर लावण्यात आलेले नव्हते. आता या रुग्णालयात सर्वच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने सोमवारपासून वाढीव दर लागू करण्याचा प्रशासनाने घेतला आहे. दारिद्र रेषेखालील कुटुंबियांना मोफत उपचार केले जातात.रोज १२०० रुग्णांची तपासणीवैद्यकिय महाविद्यालयात दिवसाला एक हजार ते बाराशे रुग्ण तपासणी व उपचारासाठी येतात तर ३० ते ४० रुग्ण दररोज अ‍ॅडमीट होतात. आज मितीस ४३० रुग्ण रुग्णालयात अ‍ॅडमीट आहेत. प्रसुतीसाठी महिला रुग्ण व अपघाताची संख्या सर्वाधिक असते. नवजात शिशू कक्षात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील बुलडाणा, औरंगाबाद व बºहाणपुर येथून येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.असे आहेत नवीन दरबाह्यरुग्ण विभाग (केस पेपर) : २० रुपयेआंतररुग्ण विभाग : ३० रुपयेआहार शुल्क : ३० रुपयेइसीजी : ७० रुपयेएक्स रे : ७० रुपयेसोनोग्राफी : ११० रु. सीटी स्कॅन : ३५० रु.वैद्यकिय सेवेतील प्रत्येक प्रकारातील दरात वाढ झालेली आहे. ही वाढ फारसी नाही. १० ते ५० रुपयांच्या घरातच वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून त्याची अमलबजावणी केली जाणार आहे. वैद्यकिय महाविद्यालय झाल्याने नवीन यंत्र दाखल झाले आहेत. दिवसाला एक हजाराच्यावरच रुग्णांची तपासणी होते. कधी कधी तर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होतात. रुग्णसेवा असल्याने टाळता येत नाही. उपचार करावेच लागतात.-डॉ.किरण पाटील, वैद्यकिय अधीक्षक,शासकीय वैद्यकिय महाविद्यालय

टॅग्स :Jalgaonजळगाव