यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, आंचलवाडी व पळासदडे येथील ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते. सदर धनादेश आंचलवाडी येथील मृत रोशनी बल्लू बारेला व ज्योती बल्लू बारेला यांचे वडील बल्लू बारेला व त्यांची पत्नी तसेच पळासदडे येथील मृत दिलीप भादूगिर गोसावी यांचे वडील भादूगिर गोसावी यांच्या हातात आमदारांनी सुपूर्द केली. यावेळी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अजून प्रत्येकी एक लाखाची मदत मिळू शकणार असल्याचे आमदारांनी सांगत, त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील महिन्यात १६ जून रोजी ही घटना घडली असताना अवघ्या एकच महिन्यात मदत प्राप्त झाल्याने मृतांच्या वारसांसह दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी आमदारांसह तहसीलदारांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच तालुक्यातील आंचलवाडी येथे वादळामुळे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड कोसळून झोपडी दाबली जाऊन त्यात पावरा समाजाच्या ज्योती बारेला (१६) आणि रोशनी बारेला (१०) या सख्ख्या बहिणींचा दबल्याने मृत्यू झाला होता, तर याच दिवशी तालुक्यातील पळासदडे येथे दुपारी चारच्या सुमारास वादळासह पाऊस सुरू झाल्याने दिलीप भादूगिर गोसावी (५७) यांच्या डोक्यावर वादळाने भिंत पडून ते मृत झाले होते.
धनादेश वितरणप्रसंगी प्रदीप लक्ष्मण ठाकूर यांचे वारस रूपाली प्रदीप ठाकूर रा. अमळनेर, वसंत आसमन भिल यांचे वारस हिराबाई वसंत भिल रा. दापोरी बु., जगदीश नामदेव पाटील यांचे वारस वंदना जगदीश पाटील रा. देवगाव, प्रवीण शिवाजी पाटील यांचे वारस अर्चना प्रवीण पाटील रा. दहिवद, राजू बाबूराव पारधी यांचे वारस आशाबाई राजू पारधी रा. अमळनेर, शांताराम भोजू भिल यांचे वारस शेवकाबाई शांताराम भिल रा. दापोरी बु., भाऊसाहेब गोरख पाटील यांचे वारस छायाबाई भाऊसाहेब पाटील रा. दहिवद, ईश्वर महादू पाटील यांचे वारस मायाबाई ईश्वर पाटील रा. अमळनेर आदींना धनादेश देण्यात आले.