शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक : १०६ वर्षे जुना गोरजाबाई जिमखाना बनला राजकीय घडामोडींचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:07 IST

विजय कोल्हे अध्यक्ष

ठळक मुद्दे‘फोडा आणि...’ या नितीचा ब्रिटीशकालीन जिमखान्यातच अवलंबविविध खेळ की राजकीय ‘खेळी’चा आखाडा

जळगाव : महापालिका निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच रंगू लागला असून विविध खेळांसाठी असलेले गोरजाबाई जिमखाना आता राजकीय ‘खेळी’चेदेखील केंद्र बनले असल्याचे चित्र आहे. महापौर ललित कोल्हे यांच्यासह त्यांचे वडील, आई व इतर नगरसेवकांच्या भाजपा प्रवेश निश्चितीची ‘खेळी’देखील येथेच झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली.सभासदाव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसलेल्या व १०६ वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन या जिमखान्यातच ब्रिटीशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नितीचा कट शिजल्याचा या निमित्ताने प्रत्यय येत आहे.मनपा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. गेल्या दोन दिवसात तर अनेक जण इकडून तिकडे प्रवेश करीत असल्याने सर्वांचीच उत्सुकता दररोज शिगेला पोहचत आहे. यात १० दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या महापौर ललित कोल्हे, त्यांचे वडील नगरसेवक विजय कोल्हे, आई सिंधूताई कोल्हे यांच्यासह मनसेच्या पाच नगरसेवकांनी रविवारी रात्री जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.या प्रवेशापूर्वी मंत्री महाजन यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन ‘मोठी’ फिल्डिंग लावून ठेवली होती. त्याचाच एक भाग म्हणजे ललित कोल्हे व इतरांचा भाजपा प्रवेश होण्यापूर्वी त्यांच्याही बैठका झाल्या. यात भाजपा प्रवेश करताना कोणती निती असेल या बाबत सर्व काही शिजले ते नगरसेवक विजय कोल्हे अध्यक्ष असलेल्या गोरजाबाई जिमखान्यात.ब्रिटीशकालीन जिमखानानवीपेठेत असलेला हा जिमखाना ब्रिटीश राजवटीचा साक्षीदार आहे. १९१२मध्ये स्थापन झालेल्या या जिमखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सभासदांशिवाय कोणाही प्रवेश नाही. तशा सूचनाच येथे फलकावर लावण्यात आल्या आहेत. मात्र अध्यक्ष असलेले विजय कोल्हे यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील तीन सदस्य व इतरांच्या भाजपा अर्थात राजकीय पक्ष प्रवेशाची बैठक या जिमखान्यात झाली.विविध खेळ की राजकीय ‘खेळी’चा आखाडा१०६ वर्षापूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी सिमकॉक्स यांनी शहरवासीयांसाठी जिमखान्याची स्थापना केली. विविध खेळांसाठी असलेल्या या जिमखान्यात मात्र आज खेळांसोबत राजकीय खेळीदेखील होऊ लागल्याने जिमखाना राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे.ब्रिटीश नितीचा अवलंबविकासाची भाषा करणाऱ्या भाजपाला इतरांचे उमेदवार पळविण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित होत असतानाही सत्तेसाठी ब्रिटीशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नितीचा ब्रिटीशकालीन जिमखान्यातच अवलंब केला गेला हे विशेष.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव