लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत ६६९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी ३७८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर कंपनीच्या स्तरावर कार्यवाही सुरू असलेले प्रस्ताव १३० आहेत. या अपघात विमा योजनेत फक्त ५५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. जिल्ह्यात कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे वेळोवेळी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती दिली जाते.
त्यात सद्या ५५ प्रस्ताव
प्रलंबित आहेत. यात अपघात झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करणे, सर्पदंश, इतर अपघात यासाठी
राज्य सरकारने ही गोपीनाथ मुंडे जनता अपघात विमा योजना लागू केली आहे. कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी वेळोवेळी तालुका अधिकारी, अर्जदार, कंपनीचे प्रतिनिधी आणि इतर संबंधितांचे मेळावे घेऊन या योजनेतील प्रलंबित प्रस्तावांची आकडेवारी कमी केली आहे. त्यात बहुतांश शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
जळगाव
वर्ष - प्राप्त प्रस्ताव - तालुका स्तरावर प्रलंबित त्रुटी संख्या -
कंपनी स्तरावर कारय्वराही - मंजूर - ना मंजूर
२०१६-१७ १२९- ०-४-९३-३२
२०१७-१८ १३७-०-६-११७-१४
२०१८-१९ १८२-१०-१८-१०८-४६
२०१९-२० २२१-४५-१०२-६०-१४
एकूण ६६९- ५५-१३०-३७८-१०६
काय होतो फायदा
शेतकऱ्याचा यात जर मृत्यू झाला असेल तर दोन लाख रुपये, अवयव निकामी असेल तर एक लाख रुपये दिले जातात.
कोट
आम्ही मेळावे घेऊन मंजूर जास्त आहेत. लवकरात लवकर ते देखील मंजूर होतील. संबंधित कर्मचारी, अर्जदार, कंपनी प्रतिनिधी यांना एकत्र बसवून घेतले जातात. आताच संबंधित विभागांना पत्र देण्यात आले आहे. जे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावर देखील लवकरच निर्णय घेतला जावा, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. - अनिल भोकरे, कृषी उपसंचालक