शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात गुड फ्रायडेनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतून प्रभू येशू यांच्या अंतिम प्रवासाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:21 IST

विश्वशांतीसाठी प्रार्थना

ठळक मुद्देप्रार्थना, उपासना सभेच्या सुरुवातीला गीत सादरप्रभू येशू यांना क्रुसावर चढविताचा देखावा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३१ - गुडफ्रायडेनिमित्त शहरातील चर्चमध्ये उपासना, प्रार्थना करण्यात आली. सोबतच शिरसोली रस्त्यावर मेहरुण तलावानजीक असलेल्या सेंट थॉमस चर्चच्यावतीने प्रभू येशू यांना क्रुसावर चढविताचा देखावा साकारण्यात येऊन प्रभूच्या अंतिम प्रवासाचे दर्शन घडविण्यात आले.गुडफ्रायडेनिमित्त पांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्चमध्ये ३० रोजी गुड फ्रायडे उपासना करण्यात येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. सोबतच प्रभू येशू यांचा संदेशदेखील देण्यात आला.प्रार्थना, उपासना सभेच्या सुरुवातीला गीत सादर करण्यात आले. सोबतच बायबलचे वाचन करण्यात येऊन विश्वशांती, सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रमुख वक्ते चर्चचे धर्मगुरु शशिकांत वळवी यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रभू येशू यांची शिकवण सांगितली. या वेळी चर्चचे सचिव आर.बी. इंगळे, कोषागार एस.बी. गावीत, प्रकाश शिंदे, प्रकाश आठवले, रत्नाकर मेश्रामकर, नितीन मकासरे, संजय पारधनी, एलिझाबेध वळवी, संगीता पवार, उषा आठवले, सर्व प्रमुख, सण्डे स्कूलचे मुले-मुली, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विनय गायकवाड यांनी केले व आभार मानले.मेहरुण तलावानजीक असलेल्या सेंट थॉमस चर्चच्या वतीने ३० रोजी संध्याकाळी चर्चपासून ते सेंट टेरेसा स्कूलपर्यंत रॅली काढण्यात आली. यामध्ये प्रभू येशू यांना क्रुसावर चढविताचा देखावा साकारण्यात आला. त्यानंतर चर्चमध्ये फादर डेव्हीस यांचे मार्गदर्शन झाले. या वेळी फादर जोशी, फाजर बिजू यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे परवानगी नाकारलीसेंट थॉमस चर्चच्या वतीने दरवर्षी चर्च ते मोहाडी रस्त्यापर्यंत रॅली काढण्यात येते. मात्र ३० रोजी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने ही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे चर्च ते सेंट टेरेसा स्कूलपर्यंतच या वर्षी रॅली काढण्यात आली.

टॅग्स :Good Friday 2018गुड फ्रायडे २०१८Jalgaonजळगाव