शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णनगरी जळगावात ग्राहकांनी साधला सुवर्णवेध, सोने खरेदीसाठी मोठा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 12:03 IST

ग्राहकांनी बाजार बहरला : मुहूर्त साधण्यासाठी सुवर्णनगरीत गर्दी

ठळक मुद्देसर्वच प्रकारच्या अलंकारांना मागणीरात्री र्पयत गर्दी करोडो रुपयांची उलाढाल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.   विजयादशमीपासून सुरू असलेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्यापही कायम असून आज ‘सुवर्णनगरी’ गजबजून गेली होती.  दरम्यान, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह कपडे व  इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी  होऊन संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. मात्र गेल्या दीड वर्षापासून विविध कारणांनी सोने खरेदीत मंदीचे वातावरण होते. त्यानंतर  विजयादशमीला शहरातील सुवर्ण पेढी गजबजून  गेल्या होत्या. हा उत्साह अद्यापही कायम आहे. त्यात धनत्रयोदशीला सोने खरेदीला मोठे महत्त्व असल्याने या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी 11 वाजेपासून सुवर्णपेढींमध्ये मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली, ती रात्रीर्पयत कायम होती. शहरात आज सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून आली. धनत्रयोदशीला सोने खरेदी करायची असल्याने अनेकांनी जुन्या दागिन्यांची मोड देऊन  मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती दिली. या सोबतच अनेकांनी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवले. शहरातील 150च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले. कपडे, फटाके खरेदीचीही लगबगबाजारपेठेत कपडे खरेदीसाठीदेखील ग्राहकांनी गर्दी केली होती. यामध्ये रेडीमेड कपडय़ांना अधिक मागणी होती. दिवाळीचा आंनद साजरा करण्यासाठी फोडण्यात येणा:या फटाक्यांच्या दुकानांवरही गर्दी  होती.350 दुचाकींची विक्रीसोने खरेदीसह दुचाकीचा बाजारदेखील बहरला. यामध्ये एकाच दालनामध्ये 250 दुचाकींची विक्री झाली. इतर दालने मिळून 350 वाहनांची विक्री झाली. या सोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये एलईडी, फ्रिज, वाशिंग मशिन यांना मोठय़ा प्रमाणात मागणी राहिली. मोबाईल खरेदीसाठीदेखील विविध दुकानांवर गर्दी होती. यामध्ये 200 मोबाईल विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. विविध योजनांचाही ग्राहकांकडून फायदा घेतला जात आहे. -मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स

दुचाकीच्या खरेदीस मोठा प्रतिसाद मिळत असून आज 250 दुचाकींची विक्री झाली. दोन दिवसात यामध्ये अजून वाढ होणार आहे. -अमित तिवारी, महाव्यवस्थापक, राम होंडा.