शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
3
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
4
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
6
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
7
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
8
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
9
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
11
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
12
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
13
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
14
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
15
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
16
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
17
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
18
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
19
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सोने- चांदी दरात दुसऱ्या दिवशीही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:13 IST

जळगाव : अमेरिका व इराणमधील तणाव वाढत असल्याने त्याचा परिणाम सोने व चांदीच्या भाव वाढीवर होत आहे. सोने- चांदीच्या ...

जळगाव : अमेरिका व इराणमधील तणाव वाढत असल्याने त्याचा परिणाम सोने व चांदीच्या भाव वाढीवर होत आहे. सोने- चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ झाली. एकाच दिवसात सोने आठशे रुपयांनी तर चांदी एक हजार रुपयांनी वधारले आहे. सोने $४०,६०० रुपयांवरून ४१, ४०० तर चांदी ४८ हजार रुपयांवरून ४९ हजारावर पोहचले आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य, वायदे बाजार या सर्वांचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असतो. यात अमेरिका, युरोपियन देशांच्या सराफ बाजारावर भारतीय बाजारातील सोन्याचे भाव अवलंबून असतात. त्यात आता अमेरिका व इराण यांच्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी सोने ३९ हजार ५०० रुपयांवर राहिले. २ रोजी त्यात १०० रुपयांनी वाढ होऊन ते ३९ हजार ६०० रुपये प्रती तोळा झाले होते. यानंतर अमेरिका व इराण यांच्यातील तणाव पाहता सोने-चांदीचा बाजार तापू लागला आहे.अमेरिका- इराण यांच्यात तणाव वाढल्याने त्याचा परिणाम सोने- चांदीच्या दरात झाला आहे. मात्र खरेदी वाढलेली नाही. दोन्ही देशातील तणाव निवळल्यास दर खाली येऊ शकतात.-पंकज लुंकड, सराफा व्यावसायिक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव