शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जगदंबेच्या पावलांनी 'सुवर्ण' झळाळी, भाव कमी झाल्याने सोने-चांदी खरेदीची संधी

By विजय.सैतवाल | Updated: September 26, 2022 16:19 IST

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन ५० हजार ३०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव ८०० रुपयांनी कमी होऊन ५६ हजार रुपये प्रति किलोवर आले.

जळगाव : पितृपक्ष संपताच सुवर्ण व्यवसायातील मंदीचा काळ संपून, या व्यवसायात नवरात्रोत्सवापासून ‘सुवर्ण’ झळाळी येणार असल्याचे सुखद संकेत दिले जात आहे. यातच, नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी मुहूर्त साधला आहे. यातच, सोने-चांदीचे दरही कमी झाल्याने  ग्राहकांकडून खरेदीची संधी साधली जाणार आहे. विशेष म्हणजे, सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ असल्याचेही सांगितले जात आहे. एकूणच आदिशक्तीच्या आगमनाने बाजारपेठेत चैतन्य पसरले असल्याचे सुखद चित्र आहे.

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन ५० हजार ३०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव ८०० रुपयांनी कमी होऊन ५६ हजार रुपये प्रति किलोवर आले. सोने-चांदी हे सुरुवातीपासूनच सर्वांचे आकर्षण आहे. यामुळे महिला वर्गाचा विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्याकडे कल असतो. यातच विविध मुहूर्त साधून खरेदीला महत्त्व दिले जाते. 

मध्यंतरी दोन वर्षे निर्बंधामध्ये गेल्याने काहीशी बंधने होती. मात्र निर्बंध पूर्णपणे हटविल्याने बाजारपेठेत उत्साह आहे. त्यात  आता सुवर्ण व्यवसायातील पितृपक्षाचा मंदीचा काळ संपला असून नवरात्रोत्सवापासून खरेदीला वेग येऊ लागला आहे. शिवाय गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने  त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. नवरात्र व आगामी सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर सुवर्ण व्यवसायिकांनीदेखील सोने चांदीचे आकर्षक आभूषणे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे पाय आपसूकच सुवर्ण पिढीकडे वळतील, असा विश्वास सुवर्ण व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.

भाव कमी झाल्याचा फायदा -ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव ५२ हजार रुपयांच्या पुढे प्रति तोळा तर चांदी ५९ हजार रुपये प्रति किलोच्या पुढे होते. मात्र हळूहळू हे भाव कमी होत गेले व आता सोने ५० हजार ३०० रुपये प्रति तोळा असून चांदी ५६ हजार  रुपयांवर आहे. शिवाय गेल्या वर्षाच्या तुलनेत चांदीचेही भाव पाच हजार रुपयांनी कमी आहे. भाव कमी असल्याने ग्राहक याचा फायदा घेऊ शकतात.

सुरक्षित गुंतवणूक म्हणून कलकोरोनामुळे वेगवेगळ्या व्यवहारावर परिणाम होऊन अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदीला पसंती दिली. त्यानुसार आताही भाव कमी झाल्यामुळे ही खरेदी आणखीनच वाढणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होऊन भाववाढ होण्याची शक्यता तर आहेच, शिवाय त्या पूर्वी  विजयादशमी, धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा या काळातहीदेखील सध्याच्या तुलनेत भाववाढ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने आत्ताच खरेदीची योग्य वेळ असून नवरात्रोत्सवात सुवर्ण बाजार चांगलाच गजबजणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

सुवर्ण अलंकारांसह चांदीच्या वस्तूंना वाढते मागणी -पितृपक्ष पक्ष संपताच आता घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असून सुवर्ण अलंकारांसह चांदीचे पूजा साहित्य, लहान मूर्ती, मुकूट, छत्र, सिंहासन यांना मागणी राहणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रोत्सवापासून सुवर्ण व्यवसायात खरेदीची लगबग असते. त्यात सध्या सोने-चांदीचे भाव कमी असून या काळात खरेदी केल्यास फायदेशीर ठरणार आहे. - भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदीjewelleryदागिने