शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोने ३५ हजारानजीक पोहोचून गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 11:42 IST

५०० रुपयांनी घसरण

जळगाव : अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात वाढ करण्यासह अमेरिका, इराण व इराकमधील तणावामुळे तसेच मुंबई शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम या सर्वांमुळे सुवर्ण बाजार अस्थिर होऊन मोठी चढ-उतार होत आहे. यात ८ जुलै रोजी सोने ३४ हजार ९०० रुपयांवर पोहचल्यानंतर ९ रोजी एकाच दिवसात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ३४ हजार ४०० रुपयांवर आले. चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे सध्या अमेरिका, इराण, इराक यांच्यातील तणावाच्या वातावरणाचा परिणाम सोन्यावर होत आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम वाढ होत आहे. त्यामुळे २० जून रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतर सोन्यात चढ-उतार सुरूच राहून ४ जुलै रोजी ते ३४ हजार ४०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ५ रोजी सकाळी हेच भाव असताना दुपारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला व त्यात सोन्यावरील सीमा शुल्कात अडीच टक्क्याने वाढ करण्यात आल्याने सोन्याचे भाव ३५० रुपये प्रती तोळ््याने वाढले व ते ३४ हजार ७५० रुपयांवर पोहचले. ही भाव वाढ अशीच सुरू राहून सोन्याने ३५ हजाराकडे झेप घेत ८ रोजी ते ३४ हजार ९०० रुपयांवर पोहचले.५०० रुपयांनी घसरण३४ हजार ९०० रुपयांवर सोने पोहचले असताना ते ३५ हजारावर जाणार असे वाटत असतानाच शेअर बाजारात मोठी घसरण होण्यासह आंरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी सोने खरेदीत हात आखडचा घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कमी झाले व भारतातही सोने एकाच दिवसात ५०० रुपये प्रती तोळ््याने घसरुन ९ जुलै रोजी ते ३४ हजार ४०० रुपयांवर आले.विशेष म्हणजे भारतीय रुपयांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे भाव वधारल्यास सोने महाग होते. मात्र ९ रोजी डॉलरचे ६८.४४ रुपयांवरून ६८.६८ रुपये झाले तरी सोन्यात ५०० रुपयांनी घसरण झाली. तस्करीमुळे हे परिणाम होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

अमेरिका, इराण, इराक यांच्यातील तणावाची स्थिती व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी-जास्त होत असल्याने भारतातही सोन्याचे भाव कमी जास्त होत आहेत. सोबत मुंबई शेअर बाजारातील घसरणीमुळेही सोन्याचे भाव ९ रोजी कमी झाले.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव