शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षात सोन्याचे दर घसरू लागले, भाव दोन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर 

By विजय.सैतवाल | Updated: September 19, 2022 17:33 IST

गेल्या आठवड्याच्या तुलनेत मात्र चांदी वधारली

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ५१ ते ५२ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात पितृपक्ष सुरू झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत असून सोमवार, १९ सप्टेंबर रोजी ते ५० हजार ४५० रुपये प्रति तोळ्यावर आले. या पूर्वी २१ जुलै रोजी सोन्याचे भाव ५० हजार ७०० रुपयांवर होते. दोन महिन्यांनंतर पुन्हा हे भाव नीचाकीवर आले आहे. दुसरीकडे गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या भावात वाढ झाली आहे. 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली होती. किरकोळ चढ-उतार वगळता ते सातत्याने ५१ ते ५२ हजारांवर राहिले. मात्र गेल्या आठवड्यापासून त्यात घसरण सुरू झाली. तसे पितृपक्षात अनेक जण खरेदी टाळत असतात. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळ‌ीवरदेखील मागणी कमी असल्याने सोन्याचे भाव कमी होत आहे. १३ सप्टेंबर रोजी ५१ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १४ रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. त्यानंतर १५ रोजी पुन्हा १५० रुपयांची तर १६ रोजी ४५० रुपयांची घसरण झाली व सोने  ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले. त्यानंतर १७ रोजी त्यात ४०० रुपयांची वाढ झाली मात्र सोमवार, १९ रोजी पुन्हा १५० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ४५० रुपयांवर आले. दुसरीकडे चांदीचे भाव वाढत आहे. १२ सप्टेंबर रोजी ५६ हजार ८०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ रोजी एकाच दिवसात एक हजार रुपयांची वाढ झाली व ती ५७ हजार ८०० रुपयांवर पोहचली. त्यानंतर १४ रोजी ८०० रुपयांची घसरण झाली मात्र १५ रोजी पुन्हा ६०० रुपयांची वाढ झाली. १७ रोजी चांदी ५७ हजार ९०० रुपयांवर चांदी पोहचली. १९ रोजी ती ५७ हजार ५०० रुपयांवर आली.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी