शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दोनच दिवसात सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:41 IST

३४ हजार २००वर पोहचले सोने

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची मागणी वाढल्याने सोने चांगलेच वधारले आहे. दोनच दिवसात सोन्याच्या भावात ९०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली. यात गुरुवारी ७०० रुपये प्रती तोळा वाढ झाली. सोन्याचा भाव ३३,३०० वरुन आता ३४,२०० रुपयांवर पोहचला आहे. गेल्या अनेक वर्षानंतर एकाच वेळी झालेली ही मोठी वाढ ठरली आहे. यासोबतच चांदीच्या भावातदेखील वाढ होऊन ती ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली आहे.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. एरव्ही डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सुधारत गेला की सोन्याचे भाव कमी होतात. या वेळी गेल्या आठवड्यापासून रुपयात सुधारणा होत असली तरी सोन्याचे भाव वाढत गेले. यात अमेरिका व इंग्लंडमध्ये सोन्याचे भाव वाढल्याने त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होऊन मोठी बाजारपेठ असलेल्या भारतातही सोन्याच्या भावात वाढ झाली. यामुळे चार महिन्यांनंतर सोने पुन्हा एकदा प्रती तोळा ३४ हजार रुपयांच्या पुढे गेले आहे.दलाल सक्रीयचार महिन्यांपूर्वी अमेरिकन डॉलर उच्चांकीवर पोहचून ७२ रुपये प्रती डॉलर भाव झाल्याने २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर त्यात घसरण होत गेली. या वेळी डॉलरचे भाव कमी (६९.५४ रुपये) असले तरी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलाल सक्रीय झाल्याने अचानक कृत्रिम मागणी वाढली व सोन्याला झळाली आल्याचे जाणकारांनी सांगितले.दोन दिवसात मोठी वाढ६ जून रोजी गुरुपुष्यामृताच्या योगावर सोन्याचे भाव ३३ हजार १०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपासून सोन्यात चढ उतार होत राहिला. मात्र १९ जून रोजी ३३ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली व २० जून रोजी सोने ३४ हजारांवर पोहचले. त्यानंतर ही वाढ सुरूच राहून २१ रोजी पुन्हा २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ३४ हजार २०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले आहे.सुवर्ण महोत्सवाचा परिणामआंतरराष्ट्रीय पातळीवर सराफ व्यावसायिकांकडून सुवर्ण महोत्सव आयोजनाची तयारी असल्याने त्या वेळी सोन्याला मोठी मागणी वाढणार आहे. त्यामुळे दलाल याचा फायदा घेण्याच्या तयारीत असून त्यांनी सोन्याची खरेदी वाढवून भाववाढीसही हातभार लावत असल्याचे जाणकारांनी सांगितले.चांदीतही तेजीसोन्या सोबतच चांदीच्याही भावात वाढ होऊन ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याला अचानक मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत. तसे आता डॉलरचे दर वाढले नसले तरी सोन्यात वाढ झाल्याने दलाल सक्रीय होत असल्याचे हे संकेत आहेत.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव