शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या वृषाली-साक्षी यांचे सुवर्ण पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST

जळगाव : जळगावच्या वृषाली ठाकरे आणि साक्षी बाविस्कर यांनी जबरदस्त खेळ करताना औरंगाबादच्या करिष्मा कालिके आणि आदिती जगताप यांचा ...

जळगाव : जळगावच्या वृषाली ठाकरे आणि साक्षी बाविस्कर यांनी जबरदस्त खेळ करताना औरंगाबादच्या करिष्मा कालिके आणि आदिती जगताप यांचा पाडाव करत, जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. दुसरीकडे प्रशांत राऊळ आणि श्रीजीत नायर यांनी पुरुष दुहेरीत कांस्य पदक जिंकले.

जल मंगल दीप युथ क्लब (जेएमडीवायसी) आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेला अखिल भारतीय पिकलबॉल संघटना (एआयपीए) आणि अमॅच्युअर पिकलबॉल फेडरेशन यांची मान्यता होती. महिला दुहेरीचा अंतिम सामना अत्यंत एकतर्फी रंगला. वृषाली-साक्षी या जोडीने सावध सुरुवातीनंतर आक्रमक पवित्रा घेत, करिष्मा-आदिती यांना एकही संधी दिली नाही. वृषाली-साक्षी यांनी सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना ११-७, ११-५ अशा विजयासह जेतेपद पटकावले.

स्पर्धेत मिश्र दुहेरी गटामध्ये जळगावने शानदार कामगिरी केली. जळगावच्याच खेळाडूंमध्ये झालेल्या कांस्य पदकाच्या लढतीत चमकदार खेळ झाला. यामध्ये अजय चौधरी-वृषाली ठाकरे यांनी कांस्य पदक पटकावताना भूपेंद्र पोळ-साक्षी बाविसकर यांचा ११-८, ११-९ असा पराभव केला.