शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलनंतर सोने-चांदी गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:52 IST

शेअर मार्केटमध्ये गंगाजळीने रुपयांत सुधारणा

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजानंतर शेअर मार्केटने उसळी घेतल्याने भारतीय रुपयांत सुधारणा झाली आहे. यामुळे सोने-चांदीच्या भावात मात्र घसरण झाली असून एक्झिट पोलनंतर सोन्याचे भाव एकाच दिवसात ३०० रुपये प्रती तोळा तर चांदी ५०० रुपये प्रती किलोने घसरून सोने ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा तर चांदी ३८ हजार ५०० रुपये प्रती किलोवर आली आहे. विशेष म्हणजे ३३ हजाराच्या उंबरठ्यावर असलेले सोने ऐन लग्न सराईत सहा दिवसात ६०० रुपयांनी कमी झाले आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने-चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यात आता देशातील लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचाही यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मुंबई शेअर बाजारासह निफ्टीने चांगलीच उसळी घेतली. यात सेन्सेक्स १४२२ अंकांनी वधारला तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ६४ पैशांनी सुधारणा झाली त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला. एक्झिट पोलचे अंदाज जाहीर होण्यापूर्वी १९ रोजी ७०.३४ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे भाव २० रोजी ६९.६० रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोनेही एकाच दिवसात ३०० रुपये प्रती तोळ््याने घसरून ३२ हजार ६०० रुपयांवरून ३२ हजार ३०० रुपयांवर आले.एकाच दिवसात दोन भावएरव्ही सोन्याच्या भावात चढ-उतार होताना ते एक दिवस उलटल्यानंतर होतात. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर मार्केट, भारतीय रुपया यावर परिणाम होताना सोमवारी एकाच दिवसात सोन्याचे भाव बदलले. सकाळी बाजार उघडला त्या वेळी सोने ३२ हजार ५०० रुपये प्रती तोळा होते. त्यानंतर दुपारी शेअर मार्केट वाढत गेले व रुपयादेखील सुधारला आणि याच दिवशी दुपारी सोन्यात २०० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन ते ३२ हजार ३०० रुपयांवर आले. मंगळवारीदेखील ते याच भावावर कायम होते.विदेशी गंगाजळीचा परिणामभारतीय शेअर बाजारात विदेशी गंगाजळी वाढल्याने विदेशात सोन्याचे भाव घसरले व दुसरीकडे भारतीय रुपया सुधारत या दुहेरी परिणामामुळे सोने घसरल्याचे जाणकारांनी सांगितले.सहा दिवसात ६०० रुपयांनी घसरणगेल्या आठवड्यात भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने सोन्याचे भाव वाढत जाऊन ते३२हजार९००रुपयांवरपोहचले. ३३ हजाराच्या उंबरठ्यावर सोने असताना ऐन लग्नसराईत एक्झिट पोलच्या अंदाजाने सोने पुन्हा गडगडले.चांदीतही घसरणसोन्यासोबतच चांदीच्या भावावरही याचा परिणाम झाला असून चांदीत ५०० रुपये प्रती किलोने घसरली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजापूर्वी ३९ हजार रुपये प्रती किलो असलेली चांदी या अंदाजानंतर ३८ हजार ५०० रुपयांवर आली आहे.शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढण्यासह भारतीय रुपयात सुधारणा झाल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव