शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परमात्माच सर्वव्यापी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:55 IST

अध्यात्म

अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मा या विषयाचे शास्त्र. अध्यात्म या शब्दात अधि अणि आत्मा हे दोन शब्द आहेत. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीज्ञान होय. ‘अंतिम सत्य शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेले अनुभवाचे मंथन’ अशीही अध्यात्मशास्त्राची व्याख्या आढळते. आपल्या अनुभवात येणारे जेवढे पदार्थ आहे, त्यातील नित्य काय व अनित्य काय हे शोधून काढण्याच्या दृष्टीने जे शास्त्र त्याकडे बघते ते अध्यात्म शास्त्र होय.अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मज्ञानाचे शास्त्र आणि अध्यात्म दर्शन म्हणजे आत्म्याविषयी दर्शन होय. या दृष्य जगाला आधारभूत असलेल्या आत्मस्वरुपाचे तर्काचे आणि नंतर त्याचा साक्षात अनुभव घेणे याला अध्यात्म दर्र्शन म्हटले जाते.अध्यात्मशास्त्राला पराविद्या असेही म्हणतात. हे तत्वज्ञान वेदामध्ये निर्माण होते व उपनिषदामध्ये पूर्ण होते. अध्यात्मशास्त्राच्या भांडारसाठी उपनिषदांना समजून घ्यायला हवे.या नश्वर जगात अमृत कुठे आहे तर याचा शोध घेता घेता वैदिक ऋषींना एकंसत्चा साक्षात्कार झाला. एकच परमात्मा सर्वव्यापी आहे. वारकरी सांप्रदायात सांगायचे झाले तर ‘विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला म्हणजेच ‘सभूमिंवृरत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्’ याचा साक्षात अनुभव घेणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. या अनुभवाप्रत ऋषी पोहोचले.प्राचीन व अर्वाचीन ब्रह्मज्ञानी पुरुषांनी अध्यात्मशास्त्राची परंपरा आजतगायत टिकवून ठेवलेली आहे. थोर संतांची त्यावरील अढळ निष्ठा यामुळेच ही परंपरा अखंडपणे टिकली आहे.संपूर्ण जगाला गवसणी घालणारे ज्याचे वर्णन करता येत नाही, ज्याचा कधीही विनाश होत अशा गोष्टीचा विचार करणे आणि त्या व्यक्त न होणाऱ्या गोष्टीतून निर्माण होणाºया व त्यातच पुन्हा लय पावणाºया या चराचर जगाचे ज्ञान करून घेणे यालाच वेदांतामध्ये अध्यात्मशास्त्र असे म्हणतात.- दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव