शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

खान्देशात शास्त्रीय गायन रुजविण्याचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:25 IST

बासरी वादक विवेक सोनार : स्थानिक कलावंतांना देणार प्रोत्साहन

ठळक मुद्देपंडित विवेक सोनार यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून बासरी वादनाचा रियाज सुरू केला. प्रारंभीचे धडे त्यांनी चाळीसगाव येथेच ज्येष्ठ बासरी वादक स्व.पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर यांच्याकडे गिरविले. त्यांच्या सूचनेवरुनच पुढे विवेक सोनार यांनी मुंबई गाठून पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्यत्व पत्करले. गेल्या २० वर्षांपासून सोनार हे पंडित चौरसि अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी पंडितजींना साथसंगतही केली आहे. विवेक सोनार यांनी भारतासह १० देशांमधील श्रोत्यांना बासरी वादानाने मंत्रमुग्ध केले आहे. जूनमध्ये मोरोक्को देशात ते बासरीचे सूर छेडणार आहेत.

जिजाबराव वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव, जि.जळगाव, दि.११ : शास्त्रीय गायन आणि संगीताची आराधना कठीण आहे. एखाद्या व्रतस्थासारखे त्यात झोकून द्यावे लागते. बहुतांशी गोष्टीत खान्देश आघाडीवर असला तरी शास्त्रीय गायन, संगीतात मात्र मोठी पिछाडी आहे. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे यावर कृतीयुक्त काम केले जाणार असून, ही कला इथल्या उदयोन्मुख कलावंतांमध्ये रुजविण्याचे ध्येय असल्याचे मत बासरी वादक पंडित विवेक सोनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.प्रश्न : खान्देशाची निवड का केली?विवेक सोनार : चाळीसगावचा मी भूमिपुत्र. त्यामुळे एकूणच खान्देशाविषयी जिव्हाळा आहे. मोठ्या महानगरात शास्त्रीय गायन, संगीताचे अनेकविध कार्यक्रम होतात. चळवळीदेखील सक्रिय आहेत. त्या मानाने खान्देशात ही उणिव ठळकपणे दिसते. यासाठीच शास्त्रीय गायनाची रुजूवात येथे करावयाची आहे.प्रश्न : आपले नियोजन कसे आहे?उत्तर : शास्त्रीय गायन शिकणारे इच्छुक साधक हेरुन त्यांना गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे व्यासपीठ मिळवून दिले जाईल. चाळीसगाव हेच मुख्य केंद्र असेल. दर तीन महिन्यांनी गुरुकुल संगीत सभेचे आयोजन करून साधकांना मार्गदर्शन आणि शास्त्रीय गायनाचे धडे दिले जातील. ज्येष्ठ कलावंतांच्या उपस्थित त्यांच्या खान्देशात ठिकठिकाणी मैफिली होतील.प्रश्न : स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काय करणार?उत्तर : दर तीन महिन्यांनी कार्यक्रम झाल्याने साधकांचा उत्साह वाढेल. श्रोतावर्गही तयार होईल. तसे बघितले तर येथील श्रोत्यांमध्येही उदासिनता दिसून येते. अर्थात नियमित कार्यक्रम झाले तर चांगले परिणामही दिसतील. स्थानिक कलावंत चांगल्याप्रकारे तयार झाल्यानंतर गुरुकुलतर्फेच मोठ्या शहरांमध्ये वार्षिक संगीत सभेत त्यांना नामवंत कलावंतांबरोबर गायनाची संधी दिली जाईल.प्रश्न : होतकरू साधकांसाठी काही नियोजन आहे का?उत्तर : संगीत ही साधना आहे. ती आनंदाने रोमांचित करणारी दिव्य अनुभूती आहे. कलेला वाहून घेणाºया साधकांच्या मागे गुरुकुल प्रतिष्ठान भक्कमपणे उभे राहील. यासाठी संगीत कार्यशाळा घेणे, शिष्यवृत्ती देणे, सांगितिकदृष्ट्या साधकांना दत्तक घेणे, अशी मदत केली जाणार आहे. खान्देशातील साधकांसाठी पहिली संगीत सभा जूनमध्ये होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी गुरुकुल प्रतिष्ठान डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करावे.प्रश्न : गुरुकुल प्रतिष्ठान कोणते उपक्रम राबविते?उत्तर : २०११ मध्ये चाळीसगाव येथे गुरुकुल प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ स्वत: पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी रोवली आहे. अर्पण, स्वरांजली, आदरांजली, बासरी उत्सव, फ्युल्ट सिंफनी, बासरी फेस्टीवल, बासरी वादन शिकण्याचा अ‍ॅप, ज्येष्ठ गायकांना पुरस्कार असे उपक्रम राबविते. बासरी अ‍ॅपमुळे २० देशातील इच्छुक साधक बासरी वादन शिकत आहे. नागरिकांनी आर्थिक पाठबळ दिले तर हे काम अधिक पुढे जाणार आहे. गेल्या काही वर्षात गुरुकुलच्या उपक्रमांमुळे खान्देशातील काही साधकांनी चांगली प्रगती केली आहे. 

टॅग्स :interviewमुलाखत