शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गो कलेक्टर, गो डीन, सरकारचा धिक्कार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:51 IST

अधिष्ठाता दालनाबाहेर आंदोलन, घोषणाबाजी : दोषींवर कारवाई करण्याची मागणी

जळगाव : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे देशापेक्षा जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर हा अधिक आहे़ ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे़ आता तर बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह वृध्द महिलेचा बुधवारी स्वच्छतागृहातच मृतदेह आढळून आला़ यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़ या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता कार्यालयाबाहेर ‘गो कलेक्टर गो़़़ गो डीन गो, राज्य सरकारचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़यावेळी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड़ शुचिता हाडा, अतुलसिंह हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, राधेश्याम चौधरी, राजेंद्र घुगे, सुनील खडके, दीपमाला काळे, मीनाक्षी पाटील, चेतना चौधरी, उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, प्रतिभा देशमुख, चंद्रशेखर पाटील, मनोज आहुजा, अरविंद देशमुख, रेश्मा काळे, सरिता नेरकर, सुरेखा तायडे आदींची उपस्थिती होती़रुग्णांवर लक्ष नाही का?मृत्यूदरात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर असताना सिव्हील प्रशासनाकडून चुकांवर चुका केल्या जात आहे़ गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह वृध्द महिलेचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळला अर्थातच त्याठिकाणी नियमित साफसफाई केली जात नाही व कोरोना कक्षात कोरोना रूग्णांवर लक्ष ठेवले जात नाही यासह अनेक प्रश्न कैलास सोनवणे यांच्यासह भाजपा पदाधिकारींनी उपस्थित करीत अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली़ त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत असल्याच्या प्रकाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिष्ठातांना धारेवर धरले. तर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसोबत ज्यांना काहीही नाही त्यांना सोबत ठेवले आहे़, अशी माहितीही कैलास सोनवणे यांनी अधिष्ठानांना दिली व त्या गंभीर प्रकाराबाबत त्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली़कारवाई करासिव्हील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह वृध्द महिलेचा कोविड रूग्णालयाच्या स्वच्छतागृहात मृत्यू झाला असून सिव्हील प्रशासनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक सुनील माळी यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ या संपूर्ण प्रकाराला सिव्हील प्रशासन जबाबदार असून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव