शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

देह जावो अथवा राहो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:53 IST

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पैठण येथे जीवनाविषयी एक तत्त्व सांगितले. ते तत्त्व होते प्रयत्नशीलता, निष्ठा, कोणत्याही परिस्थितीत ...

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पैठण येथे जीवनाविषयी एक तत्त्व सांगितले. ते तत्त्व होते प्रयत्नशीलता, निष्ठा, कोणत्याही परिस्थितीत आपले विधी, आचरण, साधना न सोडण्याचे. अखंड साधना, भक्ती, आचरण कशी करावी, ती प्रत्यक्ष आचरणात आणल्यानंतरच तिच्यातल्या अडीअडचणी खाचखळगे लक्षात येतात. मग आपण त्या अडीअडचणींवर कौशल्याने आपल्या ध्येयप्राप्तीच्या निष्ठेने मात करायला शिकले पाहिजे.चक्रधर स्वामींनी वानरीचा दृष्टांत सांगितलावानरी असे, ऐल खांदीवरून पैल खांदी जाएपैल खांदीवरून ऐल खांदी,देखतेया परी हे पडेलपरी धरी ती परी, ते तेचि जाणे न सुटते सूत्र ते तेचि जाणे....वानरी आपल्या पिलाला घेऊन एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाते. त्यावेळी ती खाली पडेल असे आपल्याला वाटते पण ती पडत नाही कारण या फांदीवरून त्या फांदीवर चालतांना खाली न पडण्याचे कौशल्य तिने आधीच आत्मसात केलेले असते. त्याचप्रमाणे साधक हा भौतिक सुख, ऐश्वर्याच्या अधीन झाला की त्याला नरकवास भोगावा लागतो. यासाठी आपली परमेश्वरावरील भावभक्ती, निष्ठा, साधना सुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ती साधना, निष्ठा त्याने प्रयत्नाने संपादन करायला हवी. चक्रधर स्वामींनी हे सूत्र परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयासाठी सांगितले असले तरी संसार प्रापंचिक जीवनासाठीही ती आहे.आपल्या इच्छित ध्येय प्राप्तीसाठी या सूत्रातून निष्ठा, प्रयत्नवाद व कौशल्याची शिकवण मिळते. उद्दिष्ट प्राप्तीचा अडथळा पार करण्यासाठी हा दृष्टान्त सूत्र निश्चितच आपणास प्रेरणा दायी आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधा मुंगळादेखील किती अढळ असतो, हे स्वामींनी त्यांच्या माकोड्याच्या दृष्टांतातून सांगितले आहे. एखाद्या वस्तूला तो लागला म्हणजे तो सोडत नाही त्याचे अर्धे धड तुटले तरी चालेल पण तो त्या वस्तूला चिटकून राहतो. त्याचप्रमाणे साधकाने आचरणाची प्रक्रिया आपल्या निष्ठेने, प्रयत्नाने साध्य करायला हवी व त्याचे पालनही करायला हवे. याविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात ‘ देह जावो अथवा राहो’ असा साधक असो की प्रपंचातील व्यक्ती त्याला त्याच्या उद्दिष्ट प्राप्तीत निश्चितच यश मिळेल.- वासुदेव चव्हाण, शहापूर, ता.जामनेर

टॅग्स :Jalgaonजळगाव