शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

भुसावळात तिरंगा वाढवणार रेल्वेस्थानकाची शान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 18:11 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २६ जानेवारीला १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे. भुसावळ विभागात फक्त भुसावळ स्थानकासमोर १०० फूट उंचीवर एकमेव हा तिरंगा असणार आहे. यामुळे भुसावळ स्थानकाची शान वाढणार आहे.

ठळक मुद्दे२६ जानेवारीला १०० फूट उंचीवरून रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फडकणार तिरंगाभुसावळ रेल्वे स्थानकाची वाढणार शानउद्यान व हायमास्ट लॅम्प वाढवणार स्थानकाची शान

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागात भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २६ जानेवारीला १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे. भुसावळ विभागात फक्त भुसावळ स्थानकासमोर १०० फूट उंचीवर एकमेव हा तिरंगा असणार आहे. यामुळे भुसावळ स्थानकाची शान वाढणार आहे.डीआरएम आर.के.यादव यांनी अतिक्रमण मोहीम यशस्वी केल्यानंतर झपाट्याने विकास कामे सुरू केली आहे. नुकतेच स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली जीआरपी ही इमारत जमीनदोस्त करून त्याठिकाणी रणगाडा ठेवण्यात आला आहे. याच ठिकाणी उद्यानाची निर्मिती होत आहे. तसेच देशभक्तीची भावना कायम मनात राहावी व सदैव विकास कामासाठी देशासाठी प्रेरणा मिळावी यासाठी व रेल्वे स्थानकाची शान वाढविण्यासाठी १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे.भुसावळ विभागात एवढ्या उंचावर एकमेव हा तिरंगा असेल झेंड्याची लांबी रुंदी अजून, निश्चित झालेले नाही. यावर विशेष डिझायनरसोबत चर्चा करून लांबी व रुंदी निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी तीन बाय तीन मीटर व व दोन मीटर खोल अशा पद्धतीचे फाउंडेशन तयार करण्यात येणार आहे.झेंडा उद्यान व स्थानकाची शान वाढवणार हायमास्ट लॅम्परेल्वेस्थानकाच्या दक्षिण प्रवेश द्वारासमोरील निर्मित होणाऱ्या उद्यानाची नवीन झालेल्या पार्किंग तसेच १०० फूट उंचीवरील तिरंग्याची शान वाढवण्यासाठी व या परिसरात मध्ये प्रकाश उजळून दिसण्यासाठी तिन्ही कोपºयावर हायमास्ट लॅम्प बसविण्यात येणार आहे. यापैकी एक हायमास्ट ल्ॉम्पची उंची ६० फूट, तर दोन हायमास्ट लॅम्पची उंची जवळपास ५० फूट असेल. एका हाय मास्टलॅम्पमध्ये नऊ एलईडी प्रत्येकी १५० वॅटचे दिवे बसविण्यात येणार आहे. एक हाय मास्ट लॅम्प जवळपास ४० ते ५० मीटरचा प्रकाशमय एरिया कव्हर करेल, इतकी एकाची क्षमता आहेत. एक हाय मास्टलॅम्प पार्किंगमध्ये, दुसरा दर्गा जवळ तर तिसरा हाय मास्ट गार्ड लाईनच्या रस्त्याला लागून लावण्यात येणार आहे. तिन्ही बाजूने हाय मास्ट लॅम्प लावल्यानंतर संपूर्ण परिसर प्रकाशमय होणार आहे.वाहन एक्झिटजवळही वृक्षारोपणदुचाकी व चारचाकी पार्किंगमधून स्थानकाच्या बाहेर जाण्यासाठी मार्गाला लागून जागेवर ही विविध झाडे लावून यामुळेही स्थानकाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.दरम्यान, १०० फूट उंचीवर तिरंगा झेंडा लावण्यासाठी डीआरएम आर.के.यादव, वरिष्ठ अधिकारी एम.एस.तोमर, राजेश चिखले, राजेंद्र देशपांडे, स्टेशन निर्देशक जी.आर. अय्यर, इलेक्ट्रिकल विभागाचे वहीद खान यांनी उद्यानातील जागेचे सर्वेक्षण केले.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ