पुन्हा गत वैभव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:38+5:302021-06-25T04:13:38+5:30

——- येथे ओशाळली माणुसकी... आजकाल एक फॅड जोरोत सुरू झाले आहे. ते म्हणजे ....अपघात होतात... कुणावर हल्ला होतो. कुणाची ...

Glory to the past again ... | पुन्हा गत वैभव...

पुन्हा गत वैभव...

Next

——-

येथे ओशाळली माणुसकी...

आजकाल एक फॅड जोरोत सुरू झाले आहे. ते म्हणजे ....अपघात होतात... कुणावर हल्ला होतो. कुणाची लुटालूट चालू असते.. अगदी रस्त्यावर या घटना घडतात पण रस्त्यावर तडफडणाऱ्या किंवा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीस कुणी मदत करण्यापेक्षा त्या भयंकर दृष्याचे आपल्या मोबाइलमध्ये चित्रण करतात. अतिशय माणुसकी शून्य प्रकार अनेक जण करत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघाताचे चित्रण काही जण करत असताना एका पोलिसाने पुढे येत या चित्रण करणाऱ्याच्या कानशिलात लगावली... आणि म्हणाला... अरे तो मेला आहे. तेथे तुझ्याकडचे कोणी असते तर...याचा विचार कर.. मदत करत नाही तर किमान असे कृत्य नका रे करू.. ! अगोदर मारले म्हणून हा तरुण खवळला होता पण.. नंतर हवालदाराने भावनिक टच देताच... त्या युवकाने तेथून काढता पाय घेतला.

Web Title: Glory to the past again ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.