शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा येथील शिंदे विद्यालयात गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:59 IST

पाचोरा येथील शिंदे विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम पी.के.शिंदे विद्यालयात उत्साहात झाला.

ठळक मुद्देप्रतिमा पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरवविद्यार्थ्यांनी आई-वडिलांना आनंद होईल, असे गुण दाखवून संस्कार जोपासावे

पाचोरा, जि.जळगाव : येथील शिंदे विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम पी.के.शिंदे विद्यालयात उत्साहात झाला.संस्थाध्यक्ष पंडितराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अटल पणन संचालक प्रा .गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर पाचोरा बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, अमोल शिंदे, अ‍ॅड.जे.डी.काटकर, नीरज मुनोत, श्रीराम पाटील, शिवाजी शिंदे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही. गीते, प्राथमिकचे मुख्याध्यापक सु ना पाटील, यांचेसह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.प्रा.गणेश शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना आनंद होईल, असे गुण दाखवून आजी आजोबांचे संस्कार जोपासावे. परीक्षेतील गुणांपेक्षा चांगल्या संस्कारांना अधिक महत्व असते. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्काराचेही धडे दिले पाहिजे. आपला पाल्य संस्कारित राहण्याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन केले.यावेळी शिंदे विद्यालयातील शिक्षकांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेतर्फे बाळू पवार, सागर, कोतकर, पाटील यांचा सन्मान करण्यात आला, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांत उत्कृष्ट गुण मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डी.आर. कोतकर, सुषमा पाटील यांनी केले.

टॅग्स :Educationशिक्षणPachoraपाचोरा