शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

भुसावळला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:57 IST

सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींंनी केली आहे.

ठळक मुद्देकरुणा डहाळे यांना पुन्हा रुजू कराभुसावळवासीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

भुसावळ : येथील पालिकेतील सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींंनी केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव राऊत बुधवारी भुसावळात आले. तेव्हा त्यांच्याकडे यासंबंधीचे निवेदन देण्यात आले.दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाºया, रेल्वे जंक्शन, आॅर्डनन्स फॅक्टरी, मोठे व्यावसायिक शहरात राहतात. कोरोना महामारीच्या या काळात शहराची नाजूक स्थिती आहे. असे असताना पालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही, ही शोकांतिका आहे. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यांच्याऐवजी उपजिल्हाधिकारी किरण सावंत-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १५-२० दिवस कार्य केल्यानंतर त्यांच्या जागी चोपड्याचे मुख्याधिकारी अविनाश गांगाडे यांना आठवड्यातून दोन दिवस म्हणून मुख्याधिकारी पदाचा चार्ज देण्यात आला. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसणे ही भुसावळकरांची थट्टा आहे. शहरातील विकास कामे तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठे नुकसान होत आहे.डहाळे ठरल्या राजकीय बळीकोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी पालिका, महसूल ,पोलीस, आरोग्य विभाग यांच्यात ताळमेळ बसवून समन्वय साधून महामारीच्यावर मात करणे शक्य होते. यात अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी असताना फक्त मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यांचा राजकीय बळी देण्यात आला. वास्तविक डहाळे मुख्याधिकारी असताना कंटेनमेंट झोनमध्ये बॅरिकेट्स लावणे, सॅनिटाईज करणे व इतरही समस्या त्वरित सोडवला जात होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची सोय करण्यात येत होती. सद्य:स्थितीला भुसावळ पालिकेला कोणीच वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी डहाळे यांना पुन्हा सेवेत रुजू करावे, अशी मागणी भुसावळ येथे नूतन जिल्हाधिकारी राऊत आले असता नगरसेवक निर्मल कोठारी यांच्यासह नागरिकांनी केली आहे.लोकप्रतिनिधींसह सर्वांना फोनवर देत होते प्रतिसादपालिकेविषयी काही समस्या तसेच आरोग्याविषयी काही समस्या असल्यास मुख्याधिकारी डहाळे यांना कधीही फोन लावला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत होता. अनेक अधिकारी व्यस्ततेच्या नावाने प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचेसुद्धा फोन घेत नाही. अशांवर कारवाई न करता जे इमानेइतबारे काम करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा बळी देण्यात आला, असा सूर उमटत आहे.विकास कामे रखडलीमुख्याधिकारी डहाळे पदावर असताना २५ कोटींच्या कामांना चालना मिळाली होती. सध्या विकास कामे रखडली असून, त्यांच्याकडे त्वरित पदभार द्यावा, अशी मागणी लावून धरली. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ