शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

मुलीचे पलायन, वडीलांनी घेतला गळफास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:36 AM

साखरपुड्यानंतर तरुणी झाली बेपत्ता : आईला हृदयविकाराचा झटका; बहीण व भावाचा आक्रोश

जळगाव : साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरु असतानाच मुलीने पलायन केल्याने तणावात आलेल्या आईला ह्दयविकाराचा झटका आला. तिच्यावर उपचार सुरु असतानाच पित्यानेही राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असलेल्या शांताराम गायकवाड (काल्पनिक नाव) यांच्या मुलीचा गेल्या पंधरवाड्यात धुळे येथील मुलाशी साखरपुडा झाला. त्यात मुलीला दागिने व महागडे कपडे घेऊन दिले. लग्नाची तयारी सुरु करताच २१ मार्च रोजी सायंकाळी मुलीने घरातून पलायन केले. याबाबत पोलिसात हरविल्याची नोंदही झाली. दरम्यान, या घटनेमुळे आई व वडीलांना जबर धक्का बसला. मुलाकडील मंडळींना घटनेची माहिती मिळाल्याने त्यांनी वाद न वाढविता आमचे दागिने परत करा, असे सांगितले. त्यात दोन दिवसाची मुदत मुलीच्या वडीलांनी दिली. मुलगी पळून गेल्याने समाजात बदनामी झाली म्हणून आई तणावात गेली, त्यातच तिला हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी तिला औरंगाबादला हलविण्यात आले. तेथे मोठी मुलगी व मुलगा थांबून होते.पतीच्या मृत्यूची बातमी समजताच गाठले थेट जिल्हा रुग्णालयदुसरीकडे घरी कोणी नसताना पतीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती मिळताच दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीने दोन्ही मुलांसोबत थेट जिल्हा रुग्णालयात गाठले.गायकवाड यांचा मृतदेह पाहताच तिघांनी एकच हंबरडा फोडला. त्यात आधीच आईची प्रकृती चिंताजनक असल्याने दोन्ही मुलांनी तिला सावरले. दरम्यान, या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.कुटुंब अद्यातपही तणावातगायकवाड हे पत्नी संगीता, दोन मुली व मुलगा सनी यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास होते. हातमजुरीकरुन ते उदरनिर्वाह भागवित होते. या कामी त्यांना मुलगा सनी मदत करायचा. मोठी मुलगी ज्योती हिचे लग्न झाले असून लहान मुलगी मनिषा ही शिक्षण घेते. तिचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यानंतर तिने पलायन केले. या घटनेमुळे कुटुंब कमालीचे तणावात आहे.अशी उघड झाली घटनागायकवाड यांच्या घरापासून काही अंतरावर लहान भाऊ राहतात. गायकवाड घरी एकटे असल्याने मंगळवारी दुपारी बारा वाजता भावजयी जेवणासाठी त्यांना विचारणा करायला गेली असता, दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी आवाज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्यांना सांगितले.दरवाजा तोडला असता गायकवाड यांनी घरात पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक महेंद्र गायकवाड, नरसिंग पाडवी यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

टॅग्स :Politicsराजकारण