शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

 प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने जळगाव शहरात प्रियकराने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:38 IST

प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने धीरज पद्माकर चौधरी (वय २६) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी धीरज याने तीन पानांची चिठ्ठी लिहिलेली असून पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. दरम्यान, धीरज हा भाजपा मंडळ- ५ चा उपाध्यक्ष होता.

ठळक मुद्देखंडेराव नगरात राहत्या घरी केली आत्महत्या  मयत धीरज भाजपाचा मंडळ उपाध्यक्ष आत्महत्येपूर्वीही केली प्रेयसीला फोन

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २७ : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने धीरज पद्माकर चौधरी (वय २६) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी धीरज याने तीन पानांची चिठ्ठी लिहिलेली असून पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. दरम्यान, धीरज हा भाजपा मंडळ- ५ चा उपाध्यक्ष होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धीरज हा विसनजी नगरातील मंदार डिस्ट्रीब्युटर्स या होलसेल औषधी विक्रीच्या दुकानावर कामाला होता. मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत तो कामावर होता. तेथून घरी गेल्यानंतर पंख्याला दोरी बांधून त्याने दीड वाजेच्या सुमारास गळफास घेतला. आई सुनंदा व वडील पद्माकर रघुनाथ चौधरी हे भुसावळ येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. दुपारी अडीच वाजता ते घरी आले असता पहिल्या खोलीत वडील शर्ट काढायला लागले तर दुसºया खोलीत आई गेली असता धीरज याने गळफास घेतल्याचे दिसून आले.चिठ्ठी व मोबाईल जप्तदरम्यान, रामानंद नगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खिशात तीन पानांची चिठ्ठी आढळून आली. ही चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला तर हातातील अंगठ्या व पाकीट पालकांना परत केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर साडे सात वाजता धीरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले.ऐनवेळी लग्नास दिला नकारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज याचे एका नर्स असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोन्हीही एकाच समाजाचे असल्याने धीरजच्या घरातून लग्नास होकार होता. मुलीचाही या लग्नास होकार होता, मात्र ऐनवेळी कुटुंबातून नकार मिळाल्याने तसा निरोप तिने धीरजला दिला होता, त्यामुळे धीरज प्रचंड तणावाखाली आला होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी धीरज याचे प्रेयसीशी बोलणे झाले आहे.