शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

गिरीश महाजन यांची हुकूमशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:16 IST

धनंजय मुंडे यांची टिका : जामनेरात हल्लाबोल यात्रेला अडथळ्यांचा प्रयत्न

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींना मारायला सांगितले नाही ..शेतक:यांना सरसकट कजर्माफी होईर्पयत आंदोलन सुरुच ठेवणार
गिरीश महाजन यांची हुकूमशाहीधनंजय मुंडे यांची टिका : जामनेरात हल्लाबोल यात्रेला अडथळ्यांचा प्रयत्नजळगाव- जामनेर येथे हल्लाबोल यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे या ठिकाणी लोकशाही नाही तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची हुकूमशाही आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु असून या निमित्ताने जळगाव येथे बुधवारी सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत मुंडे यांनी वरील विधान केले. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांचीही स्वतंत्र पत्रपरिषद झाली. पत्रपरिषदेत मुंडे म्हणाले की, जामनेर येथे मंगळवारी रात्री हल्लाबोल यात्रेदरम्यान पथदिवे बंद केले. सभास्थळ लवकर निश्चित होवू दिले नाही. हे प्रकार पाहता या ठिकाणी लोकशाहीच नाही असे वाटते. परंतु एखादी गोष्ट दडपण्याचा प्रयत्न केला तर ती अधिकच उसळते. याचप्रमाणे जामनेरातही खूपच मोठय़ा प्रमाणात आमच्या यात्रेला प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना मारायला सांगितले नाही ..बोदवड येथील सभेत मुंडे यांनी विधान केले होते की, येथे 29 दिवस पाणी आले नाही तरी लोक गप्प कसे काय? आमच्याकडे तर लोकप्रतिनिधीला खेटराने मारले असते. या विधानाबाबत मुंडे यांनी खुलासा केला की, मी लोकप्रतिनिधीला मारा असे म्हटलो नाही. तर आमच्याकडे लोक एवढे संतापतात इकडे मात्र इतके शांत कसे राहतात हाच फरक मला निदर्शनास आणून द्यायचा होता मात्र मिडिया ब:याचदा काही व्याक्य टि¦स्ट करतात.कॉंग्रेससोबत आज बैठकयेत्या काळात समविचारी पक्षाबरोबर घेवून सरकारला घेरणार असून काँग्रेस पक्षासोबत पहिली बैठक याअधी झाली आहे. 22 फेब्रुवारीला 3 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या बंगल्यावर मुंबई येथे दुसरी बैठक होणार असल्याचीही माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेसोबत आघाडी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील झाले गप्प- तटकरेसहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायच मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे. तसेच शिवसेना दुतोंडी असून मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की, या वाघाचे गुरगुरणे बंद होते. भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षातील कुरघोडी आणि कुरबुरीच्या प्रकारामुळे फुकटचा तमाशा लोकांना पहायला मिळत आहे, असेही तटकरे म्हणाले. शेतक:यांना सरसकट कजर्माफी होईर्पयत आंदोलन सुरुच ठेवणार शेतक:यांची कर्जमाफी, शेतक:यांच्या आत्महत्या आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या हे विषय येत्या अधिवेशनामध्ये आम्ही लावून धरणार आहोत. जोपयर्ंत शेतक:यांना न्याय मिळत नाही आणि सरसकट कजर्माफी दिली जात नाही तोपयर्ंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरुच ठेवणार आहे. विविध प्रश्नांवर सरकारला अधिवेशनामध्ये सळो की पळो करुन सोडू असा इशाराही तटकरेंनी दिला.लोकांच्या अपेक्षांचे ओङो घ्यावे लागणार - सुप्रिया सुळेहल्लाबोल यात्रेदरम्यान लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत. लोकांच्या अपेक्षांचे ओङो आम्हाला घ्यावे लागणार आहे. यामुळे या प्रतिसादाचे ‘टेन्शन’ही आहे. मतांच्या अपेक्षेने ही यात्रा नसून सध्याचे राज्यकर्ते नाकर्ते आहेत म्हणून आम्हाला निवडून यायचे नाही, तर आम्ही चांगले आहोत म्हणून आम्हला निवडून यायचे आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शेतक:यांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसाशेतक:यांच्य कजर्माफीसाठी तसेच त्याच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिरातबाजीवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, अशी टिकाही सुप्रिया सुळे यांनी केली. ‘बेटी बचाव’ अभियानाच्या जाहिरातींसाठीही प्रचंड पैसा खर्च केला मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट महाराष्ट्रात स्त्रीजन्म दर हा आता घटला आहे. पत्र परिषदेला जळगावचे प्रभारी आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेखा ठाकरे, अॅड. रवींद्र पाटील, विकास पवार, विलास पाटील, कल्पना पाटील आदी उपस्थित होते.